Maldives Boycott : एका चुकीची शिक्षा किती कठोर असू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मालदीव (Maldives). अलीकडेच मालदीव सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ज्यानंतर मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचबरोबर आता बॉयकॉटचा परिणाम मालदीववरही दिसून येत आहे. या बहिष्कारामुळं मालदीवचे दररोज करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. ज्या देशाचा केवळ महसूल पर्यटक आणि पर्यटनातूनच येतो, त्या देशाची अवस्था बिकट होत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी मालदीवने तेथील प्रवासाचा खर्च निम्म्यावर आणला आहे. तरीही भारतीय तेथे जाण्यास तयार नाहीत.


जेव्हापासून भारतीयांनी मालदीववर बहिष्कार घातला आहे, तेव्हापासून देशाचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. बहिष्कारामुळे आपल्या देशातील 44 हजार कुटुंबे अडचणीत आल्याचे खुद्द मालदीवने म्हटले आहे. भारतीयांच्या नाराजीमुळे त्यांच्या पर्यटन उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे.


44 हजार कुटुंबांवर संकट


या संपूर्ण वादापूर्वी मालदीव हे भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ होते. दरवर्षी लाखो भारतीय तिथे भेट देत असत. पण भारतीयांनी बहिष्कार टाकल्याने खुद्द मालदीवनेच आपली ४४ हजार कुटुंबे आता अडचणीत आल्याचे म्हटले आहे. भारतीयांच्या नाराजीमुळे त्यांच्या पर्यटन उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलवरही लोकांनी मालदीवला भेट देण्याचे पर्याय शोधणे बंद केले आहे. त्याऐवजी, लक्षद्वीपचा शोध ३४ पटीने वाढला आहे.


रोजचे 8.6 कोटी रुपयांचं नुकसान


मालदीवचा दररोज मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. 2023 मध्ये, जगभरात प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. 2030 पर्यंत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. गेल्या वर्षी, भारतीयांनी मालदीवमध्ये 380 दशलक्ष (सुमारे 3,152 कोटी रुपये) खर्च केले. याचा अर्थ भारतीयांनी तिथे जाणे बंद केले तर मालदीवचे प्रतिदिन 8.6 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.


खर्चाची रक्कम 40 टक्क्यांनी कमी


ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग मार्केटमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या MakeMyTrip या पोर्टलने सांगितले की, लक्षद्वीपसाठी गेल्या एका आठवड्यात चौकशी 3,400 टक्क्यांनी वाढली आहे. पर्यटकांची उदासीनता पाहून आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटांनी मालदीवला भेट देण्याचा खर्चही 40 टक्क्यांनी कमी केला आहे.


मालदिवचा विमान प्रवासही झाला स्वस्त 


केवळ टूर पॅकेजच कमी झालेत असे नाही. भारतातून मालदीवच्या फ्लाइटचे भाडेही कमी झाले आहे. पूर्वी जे भाडे एका वेळेस जाण्यासाठी 20 हजार रुपये असायचे ते आता 12 ते 15 हजार रुपयांवर आले आहे. MakeMyTrip च्या वेबसाइटवर, दिल्ली ते मालदीवचे भाडे फक्त 8,215 रुपये दाखवले आहे, तेही 17 जानेवारीला. या तारखेला दिल्ली-चेन्नईचे भाडे पाहिल्यास ते 8245 रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


नवीन वर्षात पर्यटनासाठी कुठे जाल?  महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांना भेट द्या, फोटोग्राफीची आवडही पूर्ण करा