SSC CGL Tier-II Examination 2022 : जर तुम्ही एसएससी सीजीएल टियर-1 परीक्षा दिली असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने SSC CGL टियर II (SSC CGL) च्या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार SSC CGL 2022 टियर 2 परीक्षा 2 मार्च ते 7 मार्च दरम्यान होणार आहे. संबंधित उमेदवार आता आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन SSC CGL टियर II परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.
जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार SSC CGL TIER II पेपर-I (विभाग-I, II आणि मॉड्युल-I चा खंड-III) आणि पेपर-I (विभाग-III चा मॉड्युल II) मार्च 2, 3 मार्च, 6 मार्च आणि 7 मार्च रोजी होणार आहे. SSC CLG टियर II पेपर II आणि पेपर III 4 मार्च रोजी घेण्यात येईल.
SSC CGL टियर I चा निकाल 9 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाला. टियर I परीक्षा 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत घेण्यात आली. SSC CGL टियर I परीक्षेचे स्कोअरकार्ड 22 फेब्रुवारी ते 8 मार्च 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होते. टियर 2 परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊन पूर्ण परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात.
डिसेंबरमध्ये झाली होती टियर-1 परीक्षा
यापूर्वी एसएससी सीजीएल टियर-1 परीक्षा 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 9 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाला. त्याचे स्कोअरकार्ड ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर 22 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत उपलब्ध आहे.
SSC CGL Tier-II Examination 2022 वेळापत्रक कसे पाहाल?
1 : ssc.nic.in या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2 : त्यानंतर तुमच्यासमोर एक लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
3 : लिंकवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक नवीन PDF ओपन होईल.
4 : या PDF मध्ये तुम्ही तुमचं वेळापत्रक पाहू शकता. तसेच, प्रिंटआऊट देखील घेऊ शकता.
SSC CGL टियर I चाचणीसाठी सुमारे 33,55,194 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी 3,86,652 उमेदवारांची एकत्रित SSC CGL Tier-II परीक्षेसाठी निवड झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरती मोहिमेद्वारे विविध सरकारी विभागांमधील 37,409 खुल्या जागा भरणार आहे.
एसएससीचा (SSC) पूर्ण अर्थ स्टाफ सिलेक्शन कमिशन असा आहे. भारतातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असतात. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवायची आहे अशा सर्व उमेदवारांसाठी ही परीक्षा फार महत्त्वाची आहे. दरवर्षी हजारो उमेदवार सरकारी विभागांमध्ये एमएससीद्वारे नियुक्त केले जातात.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI