Costa Titch Passes Away : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa Rapper) लोकप्रिय गायक, रॅपर कोस्टा टिच (Costa Titch) याचे कॉन्सर्टदरम्यान निधन झाले आहे. गाणं गात असतानाच रॅपर मंचावर कोसळला. वयाच्या 27 व्या वर्षी कोस्टा टिचने अखेरचा श्वास घेतला आहे. रॅपरच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले आहेत. 


कोस्टा टिच जोहान्सबर्ग येथील अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत होता. दरम्यान गाणं गात असतानाचा तो स्टेजवर कोसळला. त्याचा शेवटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कोस्टा गाणं गात असताना कॉन्सर्टदरम्यान उपस्थित असलेली मंडळी डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान कोस्टा अचानक पडतो. त्यानंतर मंचावर उपस्थित असलेली मंडळी त्याला पुन्हा उभं करतात. पण दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा कोसळतो. 










कोस्टा टिच कोण आहे? (Who Is Costa Titch)


कोस्टा टिच याचं खरं नाव कोस्टा त्सोबानोग्लू असं आहे. पण कोस्टा टिच या नावाने तो जास्त लोकप्रिय आहे. कोस्टाचा जन्म 1995 रोजी दक्षिण आफ्रिकेतील नेलस्प्रूट येथे झाला. त्याची 'अॅक्टिवेट' आणि 'नकलकथा' ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. हॉलिवूडचा गायक एकॉन सोबतचं त्याचं एक रीमिक्स गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


कोस्टा टिच दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय रॅपर आणि गीतकार आहे. संगीतासोबत त्याला नृत्याचीदेखील आवड होती. वयाच्या 15 व्या वर्षी त्याने डान्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. जोहान्सबर्ग येथील 'न्यू एज स्टीझ' या डान्स ग्रुपमध्येदेखील तो सहभागी झाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला होता. पण नंतर त्याला संगीताची गोडी लागली आणि संगीतक्षेत्रात त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 


संगीतक्षेत्रातून शोक व्यक्त 


कोस्टा टिच याच्या निधनाने दाक्षिण आफ्रिकेच्या संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर संगीतक्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर कोस्टाचा मोठा चाहतावर्ग आहे. यूट्यूबवरील त्याच्या गाण्यांना 45 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 


संबंधित बातम्या


Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक, आई स्नेहलता यांचं निधन