Dinner Diet Tips : उत्तम आहार आणि चांगली झोप यामुळे आरोग्य चांगलं राहतं. आपल्या प्रत्येकाला रात्री सुखाची झोप मिळाली तर आनंदच होतो. परंतु रात्री चांगली झोप मिळेल की नाही हे सर्व तुमच्या सवयीवर अवलंबून आहे. यासाठी तुम्हाला काही सवयी बदलाव्या लागतील. यासाठी रात्रीच्या जेवणात चांगल्या भाज्यांचा (Vegetables) समावेश करायला हवा. हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणात काहीही खालं तर पोटात गोळा आल्यासारखं होऊ शकतं. यामुळे पोटात गॅस होऊ शकतं,  अस्वस्थ जाणवणं, पोट फुगणं अशा समस्याही निर्माण होऊ शकता. त्यामुळे रात्रीच्या जेवणात काही भाज्यांना आवर्जून टाळायला हव्या. जेणेकरुन तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्यांपासून दूर राहू शकता. याबद्दल जाणून घेऊया...


रात्रीच्या जेवणात या आठा भाज्या खाणं टाळा


1. फ्लॉवर किंवा फुलकोबी


आहारात फुलकोबीचा समावेश करणं चांगलं असतं. फ्लॉवरची भाजी खाण्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. परंतु, यामध्ये सल्फोराफेन नावाचं एक संयुग आढळून येतं. या संयुगामुळे पोटात गॅस भरणं आणि सूज येणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. त्यामुळे फुलकोबी पचायला जड जाते.


2. कोबी


आहारात क्रुसिफेरस कोबीच्या भाजीचा समावेश करणं अतिशय महत्त्वाचं असतं. परंतु, तुम्ही जर रात्रीच्या जेवणात कोबी खात असाल, तर यातील अतिरिक्त फायबर आणि रॅफिनोजमुळे अॅसिडिटी आणि पोटात गोळा येऊ शकतो. कोबीच्या भाजीपासून बनवलेला कोणताही पदार्थ रात्रीच्या वेळी खात असाल तर यामुळे तुम्हाला झोप येण्यास त्रासदायक ठरु शकतं.


3. कांदा 


कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट फ्रॅक्टन घटक आढळून येतो. यामुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे पोट फुगल्यासारख राहतं. कांद्यात फायबरही भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं, ज्यामुळे झोप नीट होणार नाही. पोट फुगण्याची समस्या असेल, तर रात्रीच्या वेळी कांदे खाणं टाळा.


4. लसूण


लसणामध्ये पोषणतत्व भरपूर प्रमाणात असतात. याचा सुपर फूडमध्ये समावेश होतो. पण रात्रीच्या वेळी लसूण खाणं टाळायला हवं. कारण पोटात गोळा येऊन त्रासदायक ठरु शकतं. रात्रीच्या जेवणात लसूण जास्त खात असाल तर झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.


5. मटर


मटरमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटिऑक्सिडंट असतात. यामध्ये फायबर आणि फ्रुक्टोजचंही भरपूर प्रमाण असतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त खाल्यामुळे पाटात गोळा आल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे रात्री खाणं टाळा.


6. रताळे


आपल्याकडे उपवासात रताळ्याचा भरपूर वापर होतो. यामध्ये फायबर आणि पोषक घटकही भरपूर प्रमाणात असतात. रताळे जास्तीचे खात असाल तर पचनासाठी त्रासदायक असतं. यामध्ये स्टार्ट असतं. यामुळे पोटात गॅस आणि गोळा येऊ शकतो, जे खूप त्रासदायक ठरु शकतं.


7. ब्रोकोली


ब्रोकोली ही कोबीच्या प्रकारातील भाजी आहे. यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर अनेक घटक आढळून येतात. यामध्ये रॅफिनोज नावाचा शुगरयुक्त घटक असल्यामुळे पचनास त्रासदायक ठरु शकतो. यामुळे पोटात गॅससारखी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात ब्रोकोली खाणं टाळा. कारण अपचनाचा समस्या निर्माण होऊ शकते.


8.  ब्रुसेल्स स्प्राऊट


ब्रुसेल्स स्प्राउटही कोबी प्रकारातील भाजी आहे. यामध्येही रॅफिनोज नावाचा घटक आढळून येतो. त्यामुळे ही भाजी पचायला जड जाते. या भाजीमध्येही फायबरचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे पोटात गॅस आणि गोळा येऊन त्रासदायक ठरु शकते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.