Rajan Patil & Amol Mitkari: सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जोरदार आनंद साजरा केला होता. यावेळी बाळराजे पाटील (Balraje Patil) यांनी अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केले होते. 'अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही', असे वाक्य बाळराजे पाटील (Balraje Rajan Patil) यांनी बोट दाखवत उच्चारले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान या प्रकरणी टीका होऊ लागल्यानंतर आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजन पाटील आणि बाळराजे पाटील या दोघांनीही याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

Continues below advertisement

राजन पाटलांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर अनगर नगर पंचयातीची निवडणूक लागली. ग्रामपंचयातीतून नगरपंचायतीत रुपांतर झालेल्या या गावची ही पहिलीच निवडणूक होती. याही वर्षी परंपरे प्रमाणे अनगरमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. केवळ नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे ह्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र त्यांचाही अर्ज छाननीत बाद झाल्याने तिथेही राजन पाटलांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील ह्या बिनविरोधच नगराध्यक्ष पदी निवडून आल्या. याच निकालानंतर अनगरमध्ये राजन पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढला आणि विजयोत्सावाला सुरूवात झाली. याच विजयोत्सवात बाळराजेंनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. 

Who is Balraje Rajan Patil: अजित पवारांना बोट दाखवत इशारा देणारे बाळराजेंचा परिचय

-बाळराजे म्हणजे विक्रांत पाटील हे राजन पाटलांचे ज्येष्ठ पूत्र आहेत.-ते 2017मध्ये अनगरमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले.-राष्ट्रवादीतूनच वडिलांपाठोपाठ बाळराजेंनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली.-सध्या ते लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.-वडील राजन पाटलांप्रमाणेच बाळराजे यांचाही मोहोळ मतदारसंघात दबदबा आहे.-२००७ साली शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांचा खून झाला होता. यात बाळराजे पाटील हे मुख्य आरोपी होते. त्यावेळी मोहोळमध्ये दंगल झाली होती आणि पोलिस ठाण्यालाही आग लावण्यात आली होती. याच प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.  -२०१४मध्ये माढ्यात शिवसेना युवसेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात बाळराजेंचे नाव पुढे आले होते. याही प्रकरणात बाळाराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्यराणा पाटलांवर गुन्हा दाखल झाला होता. -मध्यंतरी राष्ट्रवादीत झालेल्या अनेक बदलांमुळे राजन पाटील नाराज होते.-विशेष करून उमेश पाटील यांची सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच बाळराजे यांनी बंडाची तयारी केली होती.-त्यानंतर वडील राजन पाटलांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला.-राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली पाटलांनी आपले साम्राज्य वाढवले. पण आज त्याच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना इशारा देण्यापर्यंत बाळराजेंची मजल गेल्याने आज ते टीकेच्या केंद्रस्थानी आलेत.

Continues below advertisement