Shiv Sena Dasara Melava: पाच तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार कंबर कसली असून ही सभा विक्रमी होईल, असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. अद्याप आम्हाला शिवतीर्थावर सभा घेण्याची परवानगी मिळाली नसली तरी आमचा पहिला हक्क शिवतीर्थावर असणार, असे देसाई यांनी सांगितले. अजून शिवतीर्थाला परवानगी न मिळाल्याने आम्ही पर्यायी व्यवस्था करून ठेवली असली तरी आम्ही शिवाजी पार्क मैदानावरील हक्क सोडला नसल्याचे, देसाई यांनी सांगितले. 


आज शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमासाठी आले असता संभूराजे देसाई बोलत होते. ते म्हणाले, परवानगी न घेता दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची भाष्य करणाऱ्यांनी कायदा काय आहे, तेही पाहावं. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. केवळ कौटुंबिक वारसदार म्हणून केवळ आणि केवळ फायदा करून घेण्याचे जे काम करतात त्यांना वारसदार म्हणून या दसरा मेळावयानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांची खरी ताकद कोणाच्या मागे आहे, हे दिसेल, असा थेट इशारा ही त्यांनी दिला आहे. 


माजी मंत्री  रामदास कदम यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाल की, रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य त्यांना आलेल्या अनुभवावरून केलेले आहे. हे ज्यांना रुचले नसेल त्यांनी आंदोलन केले. ते म्हणाले, शिवसेना आमदार कैलास देशमुख यांच्या व्हिडीओ व्हायरल करीनच्या धमकीची खिल्ली उडवताना त्यांनी आमच्यावर बोलल्यावर त्यांना उत्तर देऊ असे सांगितले. तुमचे चुकले नसेल तर चौकशीला का घाबरता आणि गुवाहाटीला तुम्ही काय बोलत होता आणि नंतर काय बोलायला लागला, हे आम्हालाही माहित आहे, असं ते म्हणाले. 


शरद पवार यांना सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल जरा जास्तच प्रेम आले आहे, असा टोला लागवताना गेले अडीच वर्षे सरकार अजित पवार हेच चालवत होते, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीची अवस्था कोल्ह्याला द्राक्षे आंबट, अशी झाली आहे. राष्ट्रवादी हा सत्तेअशिवाय न राहू शकणार पक्ष असून आता सत्ता जाऊन अडीच महिनेच झालेत, तर सत्ता नसल्याने त्यांची तडफड सुरु आहे, असं ते म्हणाले. आजच्या मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत , महेश साठे , संजय कोकाटे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर महत्वाची बातमी:


दसरा मेळाव्याला परवानगी मिळो वा न मिळो, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; शिवसेना नेते मिलिंद वैद्य