Mahavitaran Strike Pandharpur : आज राज्यभर महावितरणच्या (Mahavitran) अधिकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. महावितरणच्या खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात विविध ठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. पंढरपूरमध्ये (Pandharpur) देखील महावितरणचे कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatana) पाठिंबा दिला आहे. आंदोलस्थळी उपस्थित राहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
खासगीकरणामुळे राज्यातील सर्व वीज ग्राहकांसह कर्मचारी अडचणीत येऊ शकतात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार महावितरण कंपनीच्या खासगीकरण विरोधात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आज पाठिंबा दिल्याची माहिती
पंढरपूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिली. देशातील सर्व महत्त्वाच्या सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील अदानी अंबानींच्या घशात घालण्याचा डाव या सरकारचा आहे. खासगीकरणामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व वीज ग्राहक व कर्मचारी अडचणीत येऊ शकतात. कारण jio कंपनी सुरु झाली तेव्हा BSNL सह इतर मोबाईल कंपन्या अडचणीत येईपर्यंत jio ने डाटा फुकट दिला. त्यामुळं सर्व मोबाईल वापरकर्त्यानी jio चे sim card घेतले व त्यानंतर जे jio कंपनी ने रिचार्ज चे दर वारेमाप वाढल्याचे सचिन पाटील म्हणाले.
72 तासात तोडगा निघाला नाहीतर 18 जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा
महावितरणचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याला वीज वितरण कंपनीच्या संघर्ष समितीने विरोध केला आहे. दखल न घेतल्यामुळं संघटनेने 72 तासाचा संप पुकारला आहे. सोलापूर जिल्ह्यात ठिक ठीकानी आंदोलनाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अदानी गो बॅक गो बॅक, खासगीकरण रद्द करा रद्द करा अशा प्रकारची घोषणाबाजी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळं एमएसईबी कार्यालय परिसर दणाणून गेला आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत. पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या 72 तासाच्या आंदोलनात तोडगा निघाला नाही तर 18 जानेवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
सकाळपासूनच राज्यभरात महावितरण कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली आहे. अदानी अंबानी यांच्यासह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. या संपामुळं अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. शासकीय कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी देखील वीज गायब झाल्यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Mahavitaran Strike: लातूर जिल्ह्यात वीज कर्मचारी संपाचा नागरिकांना फटका; अनेक ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडित