Solapur:सोलापूर जिल्हा कारागृहातल्या कैद्यांबाबत धक्कादायक प्रताप कारागृह प्रशासनाने केल्याचा समोर आले आहे .कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना रस्त्यावर उतरवत खोदकाम करायला लावल्याचा अजब प्रकार केल्याचं उघड झालं आहे .कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कारागृह प्रशासनाने हा धक्कादायक प्रकार केल्याचं कबूल केलं आहे .पाण्याच्या कनेक्शनसाठी पालिकेकडे अर्ज करूनही पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने कैद्यांना रस्त्यावर उतरवत खोदकाम केल्याची प्रतिक्रिया कारागृह प्रशासनाचे अधिकारी प्रदीप बाबर यांनी दिली आहे . एखादा कैदी पळून गेला असता तर याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे . 'एबीपी माझा'ने सवाल केल्यानंतर हे रस्त्याच्या खोदकामाचे काम थांबवून कैद्यांना पुन्हा कारागृहात मिळण्यात आले आहे . (Solapur News)
नक्की काय घडलं?
सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी उतरवून त्यांच्याकडून खोदकाम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाकडून घडलाय .कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेल प्रशासनाने जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहीत कारागृहात नवीन पाण्याच्या कनेक्शनची मागणी केली होती .मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने स्वतः कैद्यांच्या माध्यमातून खोदकाम करून घेत असल्याचं कारागृह प्रशासनाचे अधिकारी प्रदीप बाबर यांनी एबीपी माझा ला प्रतिक्रिया दिली .कारागृहातील कैदी गर्दीच्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी उतरवल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे .एखादा कैदी पळून गेला असता तर याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केल्यानंतर खोदकामाचे काम थांबवून कैऱ्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात आलं .
हेही वाचा
प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर पाच दिवस पोलिस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता. 30 मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ट न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन मंजूर केला. नागपूरच्या प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात तक्रार नोंद केली होती.