सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे (Umesh Patil) राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना ( Rajan Patil) खुलं आव्हान दिलं आहे. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो. मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला पण 'अपनी गली मे कुत्ता भी शेर होता है'. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी त्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
Umesh Patil: हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा
राजन पाटील हे अजित पवार गटाचे माजी आमदार तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. माझं राजन पाटलांना आव्हान आहे की माझ्याविरोधात लढा. माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा माझ्याकडे कारखाना, भरपूर पैसा नाही पण आमच्यात हिंमत आहे. पर्मनंट आमदार म्हणून तुम्ही म्हणवता मग हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो. मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य करण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो. आम्हाला शहीद होण्याची भीती नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
Umesh Patil: हद्द संपली की माघारी गेले
मी यांच्या गावात एकटा गेलो तेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र याबाबत मी वाच्यता केली नाही, कारण आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर लोकशाहीच्या मार्गाने जाऊन याचा पराभव करायचा आहे. एक म्हण आहे की, 'अपने गली मे कुत्ता भी शेर होता है'. हे पण कारखान्यापर्यंत आले आणि हद्द संपली की माघारी गेले. पण लक्षात ठेवा तुम्हाला पण नरखेड, मोहोळ मध्ये यायचे आहे. कोण कोणाला कमी नसते. तुम्ही फक्त बारावाड्यांचं पाणी पिलं आहात, उमेश पाटील बाराशे गावांचे पाणी पिऊन आलाय हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4 वर्षाच्या कालावधीत तुमचं 50 वर्षाचं साम्राज्य उध्वस्त करू शकेल हे लक्षात ठेवा, असा इशारा उमेश पाटलांनी राजन पाटील यांना दिला आहे.
Umesh Patil: नेमकं काय म्हणालेत उमेश पाटील?
माझ्याविरोधात लढा. माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा माझ्याकडे कारखाना, भरपूर पैसा नाही पण आमच्यात हिंमत आहे. पर्मनंट आमदार म्हणून तुम्ही म्हणवता मग हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा. जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो. मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य करण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो. आम्हाला शहीद होण्याची भीती नाही.मी यांच्या गावात एकटा गेलो तेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र याबाबत मी वाच्यता केली नाही, कारण आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर लोकशाहीच्या मार्गाने जाऊन याचा पराभव करायचा आहे. एक म्हण आहे की, 'अपने गली मे कुत्ता भी शेर होता है'. हे पण कारखान्यापर्यंत आले आणि हद्द संपली की माघारी गेले. पण लक्षात ठेवा तुम्हाला पण नरखेड, मोहोळ मध्ये यायचे आहे. कोण कोणाला कमी नसते. तुम्ही फक्त बारावाड्यांचं पाणी पिलं आहात, उमेश पाटील बाराशे गावांचे पाणी पिऊन आलाय हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4 वर्षाच्या कालावधीत तुमचं 50 वर्षाचं साम्राज्य उध्वस्त करू शकेल हे लक्षात ठेवा.