Solapur IT Raids : सोलापुरात (Solapur) सलग तिसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाचा (Income Tax Department) तपास सुरुच आहे. गुरुवारी सकाळी सात वाजता आयकर विभागानं तपासणी सुरु केली होती, अद्यापही तपासणी सुरुच आहे. गेल्या 52 तासाहून अधिक काळ झालं आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. सोलापुरातील डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर, डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक तसेच रघोजी किडनी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्यापही तपासणी सुरुच आहे.




नेमकी कारवाई का सुरु आहे? अधिकारी कोणत्या गोष्टींचा तपास करत आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली नाही. दरम्यान, ज्या ज्या ठिकाणी तपासणी सुरु आहे, त्या त्या ठिकाणी पोलीस तळ ठोकून आहेत. सोलापुरात जवळपास सात ठिकाणी आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती रडारवर आहेत. सोलापुरातील पाच नामवंत हॉस्पीटलवर ही कारवाई सुरु आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट केअर हॉस्पीटलची बँक खाती आयकर विभागाकडून सील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 




कारवाईच्या संदर्भात आयकर विभागाने कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. सात ठिकाणी आयकर विभागाकडून तपास सुरु आहे. घरांच्या, कार्यलयांच्या गेटला लॉक करण्यात आलं आहे. सात ठिकाणांपैकी एक बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्राशी देखील ते निगडीत आहेत. यासोबतच सोलापुरातल्या हॉस्पीटलवर देखील छापेमारी करण्यात आली आहे. पण नेमकी ही छापेमारी का केली जात आहे? यामधून आयकर विभागाच्या हाती काय लागणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


सोलापुरातील या सात ठिकाणी छापेमारी सुरु 


1)  मेहुल कन्स्ट्रक्शन (सोलापूर)
2) अश्विनी हॉस्पिटल (सोलापूर)
3) अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी (सोलापूर)
4) व्यावसायिक बिपीन पटेलांच्या घरी (सोलापूर)
5) स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल (सोलापूर)
6) डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक (सोलापूर)
7) रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल (सोलापूर)


महत्त्वाच्या बातम्या: