मुंबई : माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांच्यासह 72 जणांना न्यायालयाने एका महिन्याची शिक्षा ठोठावली ठोठावण्यात आली आहे. 2015 सालच्या एका प्रकरणा तन्यायालयाने हा निकाल दिला आहे. साधारण नऊ वर्षांपर्वी मोहोळ तेथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडल्याप्रकरणी तसेच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला होता. 


जाळी तोडणे, मोर्चा काढल्यामुळे झाला होता गुन्हा दाखल


न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा खटला साधारण 9 वर्षे जुना आहे. 2015 साली मोहोळ शहरातील उड्डाणपुलाखाली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी तेथे बसू नये म्हणून प्रशासनाने त्या भागात जाळी  लावण्यात आळी होती. यालाच रमेश कदम आणि शरद कोळी यांनी कडाडून विरोध केला होता. प्रशासनाच्या या कारवाईला झुगारून देत तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याविरोधात मोर्चा काढला होता. तसेच थेट जेसीबीद्वारे लावण्यात आळेली जाळी तोडली होती.  


एका महिन्याचा कारावास, एक हजार रुपये दंड


या निर्णयाला विरोध करत त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील काढला होता. पुढे याच प्रकरणात  माजी आमदार रमेश कदम,  शरद कोळी यांच्यासह एकूण 72 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता न्यायालयाने निर्णय दिला असून रमेश कदम आणि शरद कोळी यांना एका महिन्याचा कारावास आणि 1 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.  


रमेश कदम काय म्हणाले?


न्यायालयाच्या या निर्णयानंतर रमेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांसाठी आम्ही तुरुंगात गेलो तरी आम्ही बोलत राहणार. आम्ही आवाज उठवत राहणार, असे रमेश कदम म्हणाले आहेत.  


हेही वाचा :


नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांत खदखद; मिसळ पार्टीतील नाराजीचा ठसका शिवतीर्थापर्यंत जाणार का?


मोठी बातमी: आमदाराच्या फोननंतर धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकल्याची चर्चा, तो आमदार कोण?