Farmer Agitation in Solapur : अतिवृष्टीनं (Hevay Rain) झालेल्या नुकसानीच्या मदतीचे पैसे न मिळाल्यानं तहसील कार्यालयासमोरच एका वृद्ध शेतकऱ्यानं नग्न ठिय्या आंदोलन केलं. ही घटना दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर (South Solapur Tehsil Office) घडली. अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. कुमार नामदेव मोरे असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगावचे रहिवासी आहेत. अतिवृष्टीमुळं त्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं.


तहसीलदारांनी दिला मदतीचा चेक


अतिवृष्टीची नुकासनभरपाई न मिळाल्यामुळं सोलापुरात एका वृद्ध शेतकऱ्यानं आक्रमक पवित्रा घेतला. वृद्ध शेतकऱ्यानं नग्न होऊन ठिय्या आंदोलन केलं. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर कुमार मोरे  यांनी अंगावरील सगळे कपडे काढून नग्नावस्थेत ठिय्या मांडला होता. त्यानंतर तहसीलदारांनी कुमार मोरे यांना मदतीचा चेक दिला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव इथे कुमार मोरे यांची 15 एकर शेती आहे. अतिवृष्टीमुळं त्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळं पेरलेल्या मुगाचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमध्ये जाहीर झालेली रक्कम पाठवण्यात आली आहे. पैसे बँक खात्यात लवकर जमा होतील, अशी उत्तर प्रशासनाकडून मिळाली होती. मात्र, बँकेत पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळं आंदोलन केल्याची प्रतिक्रिया शेतकरी कुमार मोरे यांनी दिली. 


कुमार मोरे यांच्या प्रश्नाची तत्काळ दखल घेतली


दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील शेतकरी कुमार मोरे यांच्या शेतीचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झाले होते. त्यांना याची मदत मिळाली नव्हती. त्यामुळं त्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर याबाबतची चौकशी आम्ही केली. तेव्हा मोरे यांच्या बँक खात्यात काही टेक्निकल चुका होत्या. त्यामुळं अनुदानाची रक्कम त्यांची खात्यावर जमा झाली नव्हती, अशी माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली. आता त्यांना आम्ही मदतीचा चेक दिला आहे. त्यांच्या प्रश्नाची आम्ही तत्काळ दखल घेतल्याची माहिती तहसीलदार कुंभार यांनी दिली. 


आंदोलनानंतर आठ हजार 160 रुपयांच्या मदतीचा चेक मिळाला


 यावर्षी झालेल्या जोरदार पावसानं माझ्या सगळ्या शेतात पाणी झालं आहे. यामुळं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पण मला शासनाकडून काही मदत मिळाली नसल्याची माहिती शेतकरी कुमार मोरे यांनी दिली. त्यामुळं मी आज नग्न आंदोलन केल्याची माहिती शेतकरी मोरे यांनी दिली. आमचा शेतीत मोठा खर्च झाला आहे. त्यातून काहीच उत्पन्न न मिळाल्यामुळं आंदोलन केल्याचे मोरेंनी सांगितले. आता मला आठ हजार 160 रुपये मदतीचा चेक दिला असल्याची माहिती शेतकरी मोरेंनी दिली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


आधी अतिवृष्टी, आता वीज तोडणी; लातूर वीज परिमंडळातील शेतकरी दुहेरी संकटात