सोलापूर: सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे त्याला नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime News) समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हॉटेल मधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे (Solapur Crime News) त्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेलचा मुजोर मालक लखन माने याने ही मारहाण (Solapur Crime News) केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे, या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर येत असून राजरोसपणे नग्न करून मारहाण करणारा हॉटेल मालक अजूनही मोकाट आहे.(Solapur Crime News)

Continues below advertisement

या व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण देताना हॉटेलचा मालक लखन माने याने त्याच्या मॅनेजरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यानी म्हटले, दुपारपासून माझा एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे. .तो वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे आणि कुठेतरी माझं आणि हॉटेलचं त्याचबरोबर मॅनेजरचाही नाव बदनाम करण्यात येत आहे. त्या मागची सत्यता काय आहे, तो व्हिडिओ काय आहे, तो व्हिडिओ कोणी काढला, का काढला, कसा काढला, ते बघूयात. तुम्हाला मॅनेजर सांगतील त्या दिवशी काय घडलं होतं, त्यावर मॅनेजरने सांगितलं की, मी गेल्या अनेक दिवसापासून या हॉटेलमध्ये कामाला आहे. चार-पाच महिन्यापूर्वी मी ड्रिंक केली होती. मला काही सुचत नव्हतं. मला घरचा टेन्शन होतं. त्यामुळे मी ड्रिंक केलं आणि त्यावेळी मी हॉटेलवर आल्यावर मला दादांनी पनिशमेंट दिली होती. पण मी काम इथच करणार आणि शिवाय मला हे माझे फॅमिली मेंबर आहेत. त्यांनी मला लागेल तेव्हा मदत केलेली आहे. हवे तेव्हा पैसे दिलेले आहेत. हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केला आहे त्यांनी असं करू नये. आज आमच्या हॉटेलचं नाव आणि दादांचं नाव बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, या गोष्टी करू नका असं मी बोलू इच्छितो असंही व्हिडिओमध्ये मार खाणाऱ्या मॅनेजरने म्हटलं आहे. 

तर पुढे हॉटेल मालकाने म्हटले हॉटेल 77 77 हे एका कुटुंबाप्रमाणे आहे. इथे काही घटना घडल्या असतील त्या मागची सत्यता काय आहे ती समजून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका. महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे चुकीचं आहे का? अशी काम करू नका, अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून असं काही पसरवू नका जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोट आहे, मी त्या गोष्टी केल्या नाहीत. मी जे काही केलं ते मॅनेजरने तुम्हाला समोर सांगितलं आहे. जर काही विषय असते तर इतकं मोठं हॉटेल मॅनेजरच्या हातात दिलं नसतं, आमचं नातं भावासारखा आहे, त्यात गालबोट लागणार नाही. जो व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांना माझं नाव बदनाम करायचा आहे, तो हेतू त्यांचा कधीही पूर्ण होणार नाही, सत्य समोर येईल. फक्त जे खरं आहे ते हे आहे, असंही लखन माने यानी म्हटलं आहे.