Solapur : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress)  माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळेमुळं काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. 

सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री राहिले आहेत. एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे हे आपल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत. त्यानंतर ते शिवसेना शिंदे गटाच जाण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सिद्धाराम म्हेत्रे यांनी जर काँग्रेस सोडली तर सोलापूर जिल्ह्यात हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का असणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नेते समजले जातात. तसेच त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम देखील केलं आहे. त्यामुळं त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. 

कोण आहेत सिद्धाराम म्हेत्रे?

सिद्धाराम म्हेत्रे हे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री होते.

4 वेळा  सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसच्या तिकिटावर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. 

अक्कलकोट येथे म्हेत्रे घराण्याची मोठी ताकद आहे. वडिलांपासून ते काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत.  

सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.  

भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आगमननंतर 2019 पासून सिद्धाराम म्हेत्रे यांची पीछेहाट झाली आहे. 

सलग दोन वेळा पराभव आणि साखर कारखाना, सहकारी संस्था अडचणीत होत्या.

 

31 मे रोजी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार

काँग्रेस सोडण्याची वेळ का आली याची कारणमिमासा सांगणार नाही सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. काँग्रेसने मला भरपूर काही दिलं, पण मागच्या काही वर्षात ज्या पद्धतीने ताकद द्यायला पाहिजे होती ची दिली नाही. कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे त्रास होतं होता, त्यामुळे काहीतरी निर्णय घ्या असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलं पाहिजे असं कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे म्हेत्रे म्हणाले. 31 मे रोजी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश होईल असेही त्यांनी सांगितले. सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्याबद्दल माला काहीही बोलायचं नाही. ज्या पद्धतीने सचिन कल्याणशेट्टी यांना त्यांच्या पक्षाने ताकद दिली तशी ताकद काँग्रेसकडून मिळाली नाही. आमच्या कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे त्रास तालुक्यात दिला जात होता. तो थांबला पाहिजे म्हणून हा प्रवेश आहे. जरं दिला जाणारा त्रास थांबला नाही तर मित्रपक्षात देखील संघर्ष मला करावा लागणार आहे. दुश्मन से दोस्ती हर हाल में अच्छी असं म्हटलं जातं. त्यामुळं ही दोस्ती देखील आम्ही करून बघू पण जरं त्रास थांबला नाही तर संघर्षही करावा लागेल असे ते म्हणाले.  माझं या संदर्भात सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे यांच्याशी कोणतंही बोलणं झालेलं नाही असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde: तेव्हा मी पायलट होतो, फडणवीस आणि अजित दादा को-पायलट; आम्ही योजनांचं टेकऑफ केलं : एकनाथ शिंदे