सोलापूर : सोलापूर भाजपचे (Solapur) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Shrikant Deshmukh resigned ) दिला आहे. वादग्रस्त अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्विकारला आहे.
दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारली होती. मात्र अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ राजीनामा दिला.
व्हिडीओ व्हायरल प्रकरणी श्रीकांत देशमुख यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने त्यांच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीकांत देशमुख दिसत आहे.
कोण आहेत श्रीकांत देशमुख?
- श्रीकांत देशमुख हे सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष
- भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेस आणि जनसुराज्य या पक्षात देखील काम केलं
- तीन- चार वेळा सांगोला मतदारसंघातून विधानसभा लढवली, मात्र त्यात अपयश
- 2009 सालच्या निवडणुकीत प्रचार दरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप श्रीकांत देशमुख यांनी केला होता
- मात्र गोळीबार बनावट असल्याचे पोलिसात तपासात समोर आल्याना त्यांना अटक देखील झाली होती
- दीड वर्षांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा सूत्र त्यांनी हाती घेतली होती