Solapur Accident News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील कोंडी इथं धक्कादायक घटना घडली. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्याहून अक्कलकोटला निघालेल्या कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. कोंडी अथं झालेल्या भीषण अपघातातदीड वर्षाच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धावत्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
पुण्याच्या देहूरोड येथील कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी जात असताना घडला अपघात
पुण्याच्या देहूरोड येथील रवी खंडागळे यांचे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी जात होते. या अपघातात सिंधू रवी खंडागळे (वय 42), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय 45) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय 32) आणि आई साक्षी मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलिसात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना, वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू
पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृत्यूच आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
वऱ्हाडाच्या ट्रक मध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये हा भीषण अपघात झाला. वऱ्हाडाच्या ट्रक मध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, एकाच वेळी तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: