Solapur Madha Railway News : माढा रेल्वे स्टेशनवरुन (Madha Railway Station) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Passengers) आणि माढा (Madha) परिसरातील रहिवाशांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आजपासून माढा रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरु झाली आहे. या निर्णयामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आरक्षण प्रणाली (Reservation system) सुरु केल्यामुळं प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे.  


गेल्या अनेक दिवसांपासून माढा रेल्वे स्टेशनवर आरक्षण प्रणाली सुरु करावी अशी प्रवासी मागणी करत होते. अखेर या मागणीला यश आलं आहे. कारण, माढा परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. प्रवाशांना कुर्डूवाडीला जावे लागत होते. पण आता माढ्यातच तिकीट आरक्षण प्रणाली सुरु झाल्यानं प्रवासी खुश असल्याचं पाहायला मिळत आहे. 


प्रवाशांची गैरसोय थांबवणार, रेल्वे विभागाच्या निर्णयाचं स्वागत : गिरीश कानडे


दरम्यान, माढा स्टेशनवर तिकीट आरक्षण खिडकी सुरु केल्यामुळं प्रवाशांची गैरसोय थांबवणार आहे. रेल्वे विभागानं घेतलेल्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करत असल्याची माहिती माढ्यातील प्रवासी गिरीश कानडे यांनी एबीपी माझाला दिली आहे. माढा स्टेशनवर प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) सुरू करण्यात आल्यामुळं प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे माढा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व माढा शहरातील रहिवाशांनी जास्तीत जास्त रेल्वे आरक्षण तिकीट बुक करावे असे आवाहन गिरीश कानडे यांनी केलं आहे. तसेच प्रवाशांनी रेल्वे विभाग आणि सोलापूर मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक (Sr.DCM)  योगेश पाटील यांचेही आभार मानले.


सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळात प्रवाशांना तिकीट बुक करता येणार


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून माढा स्टेशनवर आरक्षण प्रणालीची सुविधा सुरु करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळात प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे. तर रविवारी  सकाली 8 ते दुपारी 2 या वेळात किटीक बुक करता येणार आहे. यामुळं माढा स्टेशनच्या रेव्हीनीव्हमध्ये वाढ होणार आहे. माढा स्टेशनवर पुणे, मुंबई, दिल्ली, कर्नाटक, हैदरबाद या ठिकाणी जाण्यासाठी देखील तिकीट बुक करता येणार आहे. माढा परिसारातील वाकाव, दारफळ, केवड, उंदरगाव, जामगाव, मालवंडी, विठ्ठलवाडी, उपळाई, वैराग याठिणचे प्रवाशी मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे या ठिकाणी प्रवास करतात. आता त्यांची गैरसोय होणार नाही. दरम्यान, या आरक्षण प्रणालीला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर प्रवाशांच्या बाकीच्या मागण्या देखील मान्य होण्यास मदत होईल. 


महत्वाच्या बातम्या:


Railway PNR : रेल्वे तिकिटावरील PNR चा अर्थ काय? त्यात लपलेला कोड काय सांगतो?