सोलापूर : आमच्या विरोधकाने ईव्हीएमवर आक्षेप घेतला, वाटलं राजीनामा देतील आणि आपल्याला पुन्हा चान्स मिळेल. पण तसं काही झालं नाही असं सांगत विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला लगावला. आताच्या घडीला नेमकं कोण कोणाच्या पुढे आणि कोण कोणाच्या मागे आहे हे मात्र सांगता येत नाही असे वक्तव्य करत राम शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ईव्हीएमवरच संशय व्यक्त केला. ते सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.
उत्तमराव जानकर चार वेळा हरले पण पाचव्या वेळी जिंकल्यावर त्यानी ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचं सांगितलं. त्यांना आमच्या विरोधकाची जोड मिळाली. पण ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांनी राजीनामा दिला नाही आणि मला परत संधी मिळाली नाही असा टोला राम शिंदे यांनी लगावला.
राम शिंदे म्हणाले की, "आता कोणाचा ठाव ठिकाणा सांगता येत नाही. कोण कोणाच्या पक्षात आहे आणि कोण कोणाच्या मागे आहे अशी राजकीय परिस्थिती सध्या झाली आहे. आता उत्तमराव जानकर असते तर बरे झाले असते, त्यांच्याबाबत बोलायचे मी बरेच राखून ठेवले होते. पण त्यांच्या माघारी बोलणे योग्य होईल का सांगता येत नाही. चार वेळेला विधानसभेला पराभूत झाल्यावर ईव्हीएम घोटाळा आहे असे न म्हणणारे जानकर यावेळी पाचव्यांदा निवडून आले आणि ईव्हीएम घोटाळा असल्याचे सांगू लागले. चार वेळा हरले तेव्हा ईव्हीएम बरोबर होते आणि पाचव्यांदा निवडून आल्यावर ईव्हीएम घोटाळा असल्याचे त्यांना वाटू लागले."
राम शिंदे पुढे म्हणाले की, "उत्तम जानकरांना आमचा विरोधी जोडीदार मिळाला. मला 622 मतांनी हरवले आणि तोही म्हणला ईव्हीएम चुकले. मी म्हणालो बरं झाले, ईव्हीएम चुकले म्हणून राजीनामा दिला तर मला परत लढायला चान्स मिळेल. पण तसे काही केले नाही."
ही बातमी वाचा: