Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे. अशात सोलापूरचे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे कालपर्यंत तर नुसत्या थापाच मारत होता. देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीस आहेत, ते नुसता म्हणतात करतो करतो मात्र त्यांनी काहीच केलं नाही. भाजपाचे (BJP) लोकं फक्त आश्वासनावर आश्वासन देतात. आम्ही ते करू, हे करू सांगतात. त्याचं काम फक्त कागदावर असते. अक्कलकोट येथील प्रचार सभेत आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून भाजपसह फडणवीस यांच्यावर टिका करण्यात आली आहे. 


याचवेळी बोलतांना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "विरोधक खोटे आरोप करून चारित्र्यहणन करतील. तर, सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. जर, त्यांच्याकडे पुरावे होते, तर मागच्या दहा वर्षात कारवाई का नाही केली?” असा प्रश्न प्रणिती यांनी विचारला. सुशीलकुमार शिंदे यांनी अतिरेक्यांना सोडून दिल्याच्या राम सातपुते यांनी आरोप केला होता, त्या आरोपानंतर आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल केला आहे.


माझ्यावरती वैयक्तित चुकीचे आरोप होण्याची शक्यता...


पुढे बोलतांना प्रणिती शिंदे म्हणाल्यात की, "ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती विरोधकांचा प्रचार सुरू आहे, ते पाहून येणाऱ्या काळात माझ्यावरती वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले जातील याची मला शंका वाटते. चुकीची माहिती पसरवून चारित्र्यहणन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. चुकीचे फोटो, चुकीची माहिती देऊन चारित्र्यहणन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी त्यांना विनंती आहे, मागील दहा वर्षात त्यांनी काय काम केलं याचा लेखाजोखा मांडा आणि त्यावरती निवडणूक लढवा. सोलापूरकर हुशार असून, अशा अफवांना बळी पडणार नाहीत. सोशल मीडियावर ते म्हणतात की, आता रामराज्य येणार आहे, मग मागील दहा वर्ष रावण राज्य होतं का?” असा सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. 


दोन्ही उमेदवारांकडून जशास तसे उत्तर


सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार केला जातोय. तर, एकमेकांना होणाऱ्या टीकेला जशास तसे उत्तर देखील दोन्ही उमेदवार देतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राम सातपुते यांच्याकडून थेट सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. तर, यालाच उत्तर देतांना प्रणिती शिंदे यांनी देखील थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ram Satpute On Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असतांना 12 अतिरेक्यांना वाचवायचे काम केलं; राम सातपुतेंचा गंभीर आरोप