PM Modi Solapur Visit LIVE: पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात 9 प्रकल्पांचं लोकार्पण, भूमिपूजन
PM Narendra Modi Solapur Visit LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा, पाहा सर्व अपडेट्स...
PM Modi Visit Solapur LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आमचा मार्ग आहे गरिबांचं कल्याण. तुम्ही मोठी-मोठी स्वप्न बघा छोटी स्वप्न बघू नका. तुमचं स्वप्न माझा संकल्प आहे ही मोदींची गॅरंटी आहे. सरकारचा प्रयत्न आहे, शहरात लोकांना भाड्यानं रहावं लागू नये. आमच्या देशात गरीबी हटावचे नारे दिले पण गरिबी हटली नाही. अर्धी भाकरी खाऊ, असं सांगितलं जायचं अरे पण अर्धी भाकरी का पूर्ण खाऊ की. महाराष्ट्रातील साताऱ्याचे लक्ष्मण राव यांचे माझ्या जीवनात महत्वाचे स्थान राहिलंय. गरिबांच्या नावावर योजना बनवल्या जायच्या पण हक्क त्यांना मिळायचा नाही. पहिल्या सरकारची नियत, नीती आणि निष्ठा कटघरेमे थी, आमची निष्ठा गरिबांसाठी आहे.",
"सरकारी लाभ थेट लोकांना मिळावे याची आम्ही योजना केली. हे जे ओरडत आहेत त्यांची आम्ही मलाई बंद केली म्हणून ओरडत आहेत. हे तुमच्या हिताचे पैसे खात होते. आमच्या सरकारनं गरीब कल्याणच्या योजना केल्यात. आमच्या काळात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले.", असंही मोदी म्हणालेत.
Modi LIVE at Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत आहे. 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी 11 दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली. आज 1 लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृहप्रवेश होईल."
"माझी आनंद वाढणार की नाही. सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही, आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं.", असं मोदी म्हणाले.
मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले आणि ते भावूक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, "तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली
मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी."
PM Modi Solapur Visit LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदी सभास्थळी दाखल झाले असून त्यांनी सभास्थळी उपस्थित असलेल्या सोलापुरकरांना संबोधित केलं. त्यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. मोदी म्हणाले की, "पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार करतोय"
ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीभावानं भरलेली आहे, असं म्हणाले. पुढे ते 22 जानेवारी रोजी एवढंच म्हणताचं सभगृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणा थांबल्यानंतर मोदींनी आपलं भाषण पुन्हा सुरू केलं. 22 जानेवारीला तो क्षण येतोय भगवान आपल्या मंदिरात विराजमान होणार आहेत, असं मोदी म्हणाले.
CM Eknath Shinde LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "करोडो राम भक्तांचे स्वप्न मोदी पुर्ण करतायत. अबुदाबीतही मंदिर बनतय त्याचं उद्घाटनही मोदी करतायत. साडेनऊपूर्वी मोदींनी पंतप्रधान पदाची शपत घेतली ती देशासाठी आशेचे किरणं होती."
CM Eknath Shinde LIVE From Solapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात बोलताना म्हणाले की, "दावोसवरुन आलोय तिथे ऑफिसर मिनिस्टर, उद्योजक सर्वांच्या नावावर मोदींचं नाव होतं. मोदी सरकार पुन्हा देशात सरकार स्थापन करणार याची गॅरंटी आहे. महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार स्थापन होईल."
सोलापूरच्या पवित्र भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. मोदी जी म्हणाले होते शिलान्यास हमने किया है और उदघाटन भी हम करेंगे.
अटल सेतू, समृद्धी यांचे उदघाटन देखील मोदींनी केले होते. मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर वास्तवात होते. आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळाले आहेत. मी कालच डाओसवरून परतलो. डाओसमध्ये 3 लाख 53 हजार करोडचे एमओयुवर सह्या झाल्यात. मला तिथे अनेकांना भेटलो सर्वाच्या मुखी फक्त एकच नाव होतं मोदीजींचे. अनेक उद्योगपती तिथे आले होते..त्यांना गॅरंटी आहे मोदी जी पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करणार आहे. आमच्या राज्यात देखील डबल इंजिन सरकार बनणार आहे.
CM Eknath Shinde LIVE From Solapur: पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभेसाठी जमलेल्या सोलापूरकरांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिलान्यास आम्ही केला चावीही आम्हीच देणार, असं मोदी म्हणाले होते... यालाच म्हणतात मोदी गॅरंटी, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "घरं मिळालेल्या सर्व कामगारांचे अभिनंदन करतो. शिलान्यास हमने किया है चाबी देने के लिये हम ही आयेंगे मोदी म्हणाले होते, याला म्हणातात मोदी गॅरंटी. मोदींच्या शुभहस्ते समृद्धी महामार्ग, अटल सेतू भुमिपुजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं, मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात आहे."
PM Modi Solapur Visit LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदी सभास्थळी दाखल झाले असून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी मंचावर आडम मास्तर बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी आडम मास्तरांनी पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करताना आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. आडम मास्तरांनी चूक लक्षात येताच तात्काळ माफी मागितली आणि चूक सुधारली.
PM Narendra Modi Solapur Visit Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मोदी व्यासपीठावर पोहचले असून, काही वेळात त्यांच्या भाषणाला सुरवात होणार आहे.
PM Narendra Modi Solapur Visit Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, मोदी सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
PM Modi Solapur Visit LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूर दौरा आहे. थोड्याच वेळात मोदी सोलापुरात दाखल होतील. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस सोलापुरात काही वेळापूर्वीच दाखल झालेत.
PM Modi Solapur Visit LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील.
PM Narendra Modi Solapur Visit Today LIVE: 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी यांनी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणारं आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. सलग 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा रे नगर हा भव्य प्रकल्प साकारला गेला आहे. केवळ डोक्यावर छत नाही तर जगण्यासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
PM Modi Solapur Visit LIVE: कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे.
PM Narendra Modi Solapur Visit Today LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूर दौरा आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारी इथे साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
पार्श्वभूमी
PM Narendra Modi Solapur Visit Today LIVE Updates: सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे.
देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत नेमकी कशी आहे?
350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी यांनी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणारं आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. सलग 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा रे नगर हा भव्य प्रकल्प साकारला गेला आहे. केवळ डोक्यावर छत नाही तर जगण्यासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -