अकलूज नगर परिषद निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजप या लढ्याचे महानाट्य काल रात्री झालेल्या प्रचाराचा सांगता सभेत दिसून आले. पाण्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून झालेल्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर दिले.
मला भीती दाखवताय आत टाकायची?
खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, मला भीती दाखवताय आत टाकायची? हिंमत असल्यास तर टाकून दाखवा. मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे. सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी आत जाऊन बसेन, असा घणाघात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. काल अकलूज येथे रात्री प्रचाराची विराट सांगता सभा पार पडली. यामध्ये खासदार मोहिते पाटील यांनी लावले तो व्हिडिओ म्हणत राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एबीपी माझाची व्हिडिओ क्लिप दाखवत दहशत कोण करत आहे? असा सवाल केला.
कलूजमध्ये कोण दहशत पसरवत आहे?
काल, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली. अकलूज मधील दहशतीच्या मुद्द्यावर राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांच्या भाषणाच्या काही क्लिप्स दाखवल्या. अकलूजमध्ये कोण दहशत पसरवत आहे याचे उत्तर मोहिते पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिले. आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. मात्र, आपण धमक्यांना घाबरत नाही, असे सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपला इशारा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या