सोलापूर:  मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमदार, खासदारांना मतदार संघात अडचणींचा सामना  लागत आहे. आता  याची झळ आता अजित पवारांना (Ajit Pawar) देखील बसली आहे. मराठा आंदोलकांचा अजित पवारांवर रोष आहे. पिंपळनेर कारखाना कार्यक्रमासाठी अजित पवारांना येण्यास आंदोलकांनी विरोध केला आहे. सकल मराठा समाजाने अजित पवारांच्या प्रवेशबंदीची घोषणा केली आहे. 


  अजित पवार 23 ऑक्टोबरला माढा इथे बबनदादा शिंदे यांच्या पिंपळनेर साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी येणार आहेत. मात्र सकल मराठा समाजाने त्यांना येऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. माढा पोलिसांना तसा अर्ज दिला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी येत आहेत. 


शरद पवारांनी 2009 साली बारामती (Baramati Lok sabha Election) सोडून माढा या मतदारसंघाताला पसंती दिली होती आणि त्या ठिकाणाहून निवडूनही आले होते.  सध्याची स्थिती पाहता पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे अजित पवारांसोबत आहेत. मधल्या काळात ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. एकेकाळी या जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असणारे विजयसिंह मोहिते पाटील हे आता भाजपसोबत आहेत. विजयसिंह मोहिते पाटील हे 2014 साली मोदी लाटेतही या मतदारसंघातून निवडून खासदार झाले होते. नंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे ते भाजपमध्ये गेले. 


माढा मतदारसंघातील नस आणि नस पवारांना माहिती


सध्या सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये केवळ अंतर्गत कलहच नाही तर उभी फूट पडली आहे. बहुतांश नेत्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे असली तरी राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीला, सर्वात पहिल्यांदा मंत्रीपद मिळाल्यानंतर शरद पवारांकडे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं. त्यामुळे सोलापूर असो वा माढा... या मतदारसंघातील नस आणि नस पवारांना माहिती आहे. 


आरक्षणाच्या लढ्याची झळ आमदार, खासदारांना


 आजी-माजी आमदार आणि खासदारांना गावात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे  लोकप्रतिनिधींची अधिकच कोंडी झाली  आहे. त्यामुळे आरक्षणाच्या या लढ्याची झळ आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना बसू लागली आहे.लोकप्रतिनिधींना तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या गावांत अशा पद्धतींचे निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही गावात सध्या राजकीय कार्यक्रम बंद आहेत. 


हे ही वाचा:


मनोज जरांगेंच्या भूमिकेची आमदारांना झळ, मतदार संघात करावा लागतोय अडचणींचा सामना; आमदारांची थेट 'दादां'कडे तक्रार