Madha Vidhansabha Election News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच माढा विधानसभा मतदारसंघाची (Madha Vidhansabha Election) देखील जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी केली जातेय. माढा तालुका काँग्रेस कमिटीकडून संदीप साठे (Sandip Sathe) यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी  मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. पटोले यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती संदीप साठे यांनी दिली आहे. 


2014 ला काँग्रेसने माढा विधानसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसकडून कल्याणराव काळे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना 65 हजार मते मिळाली होती. मात्र, काळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबनदादा शिंदे यांनी पराभव केला होता. दरम्यान, त्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संदीप साठे यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. निष्ठेने त्यांनी काँग्रेसचे काम केले होते. या मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं माढा विधानसभेची जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी माढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय काका पाटील यांनी नाना पटोले यांच्याकडे केली आहे. नाना पटोलेंनी याबाबत प्रदेश काँग्रेसला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 




कोण आहेत संदीप साठे? 


संदीर साठे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.
संदीप साठे सध्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष आहेत. 
संदीप साठे हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सहकारमहर्षी गणपतराव साठे यांचे नातू आहेत.
युवक काँग्रेसच्या चळवळीत देखील त्यांनी काम केलं आहे. 
सध्या ते प्राध्यपाक आहेत. 




माढा तालुक्याची सध्या राजकीय स्थिती?


माढा तालुक्यात सध्या बबनदादा शिंदे हे आमदार आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. माढा विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुटते. मात्र, बबनदादा शिंदे अजित पवार गटात गेल्यानं महाविकास आघाडकडून ही जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी केली जातेय. दरम्यान, यावेळी माढा विधानसभा मतदारसंघातून बबनदादा शिंदे यांचे पुत्र हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात माढा मतदारसंघात राजकीय समीकरणं बदलली आहेत. माढा लोकसभेला भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडूण आले आहेत. मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं सोलापूर जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांना 52 मतांचा लीड मिळाला आहे. त्यामुळं माढा विधानसभेला महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत मोहिते पाटील यांचे मत विचारात घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.  


संदीप साठेंचे मोहिते पाटलांशी जिव्हाळ्याचे संबंध


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची माहिती संदीप साठे यांनी दिली. विजयसिंह मोहिते पाटील यांचे वडिल दिवंगत शंकरराव मोहिते पाटील हे सोलापूर जिल्हा बँकेचे पहिले चेअरमन होते. त्यावेळी चेअरमन पदाच्या निवडीवेळी संदीप साठे यांचे वडील वसंतराव साठे यांनी शंकरराव मोहिते पाटील यांना सहकार्य केले होते. वसंतराव साठे हे त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यावेळी वंसतराव साठे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारावं अशी काही जणांनी मागणी केली होती. मात्र, वसंतराव साठे यांनी ते पद नाकारुन शंकरराव मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता अशी माहिती संदीप साठे यांनी दिली. सध्या मी देखील विजयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन घेतो. एक अनुभवी आणि विकासाचा दृष्टीकोण असलेले नेते म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची ओळख असल्याचे संदीप साठे म्हणाले. त्यामुळं ते देखील माझ्या उमेदवारीला पाठिंबा देतील असेल संदीप साठे म्हणाले.   


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार पिता-पुत्र शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग