सोलापूर : शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी शिवसेना ठाकरे गटावर (Shiv Sena Uddhav Thackeray) तुफान हल्ला चढवला. "बाळासाहेबांच्या माध्यमातून वाघाशी नातं जोडलं जात होतं, मात्र आता उबाठा गटातील लोक सलीमच्या माध्यमातून कुत्त्याशी (Salim Kutta) नातं जोडत आहेत. एकेकाळी आपला सिनेमा इतका स्वाभिमानी होता की बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे, पण हा सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) त्याच 'कुत्ता'सोबत डान्स करतोय, असा हल्लाबोल ज्योती वाघमारे यांनी केला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर घणाघाती टीका केली.  


सुषमा अंधारेंवर हल्लाबोल 


बीडमध्ये ज्या व्यक्तीच्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी धाड टाकली, जो व्यक्ती पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर आहे. अशा व्यक्तीला उबाठा गटाचा जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले त्यावर सुषमा अंधारे का बोलत नाहीत? बाळासाहेबांच्या माध्यमातून वाघाशी नातं जोडलं जात होतं, मात्र आता उबाठा गटातील लोक सलीमच्या माध्यमातून कुत्त्याशी नातं जोडत आहेत. मग इथे सुषमा अक्का दहशतवाद्यांचा समर्थन करण्यासाठी पुढे येतात का? सुषमा अंधारे नेत्यांची नावं घेत आहेत. मात्र त्यांच्याकडे पुरावे असतील तर तपास यंत्रणाना द्यावे, मात्र केवळ मोठ्या व्यक्तींवरती टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणे हे आता चालणार नाही, असा हल्लाबोल  ज्योती वाघमारे यांनी केला. 



सुधाकर बडगुजरांनी सलीम कुत्तासाठी पार्टी ठेवली


यावेळी ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरही हल्ला चढवला. "शिवसेना भवनच्या बाहेर बॉम्बस्फोट करून बाळासाहेबांचा जीव घेण्याचा ज्यांचा कट होता, त्या  सलीम कुत्तासाठी बडगुजर यांनी आपल्या फार्म हाऊसवर पार्टी ठेवली" असा घणाघात ज्योती वाघमारे यांनी केला.


कुत्तो के सामने मत नाचना


एकेकाळी आपला सिनेमा इतका स्वाभिमानी होता की बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे पण हा बडगुजर त्यासोबत डान्स करतोय. जालन्यात झालेल्या दगडफेकीचा आरोपी पप्पू शिंदे यांचे फोटो केवळ उबाठा गटाच्या नेत्यांसोबत का येत आहेत? किंवा मुंब्रामध्ये अटक झालेला सलमान फाळकेचे फोटो जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत का येत आहेत?   यातले सत्य बाहेर येऊ नये म्हणून असा झगमगाट निर्माण केला जातं आहे का?" असेही सवाल ज्योती वाघमाने यांनी उपस्थित केले.  


"केवळ निनावी पत्राच्या आधारे टीका करून माध्यमांची लक्ष आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुषमा अंधारेंनी आता बंद केले पाहिजेत"


सभापती जगदीप धनखड मिमिक्रीवरुन हल्लाबोल


 दरम्यान, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याने टीमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्यावर जोरदारी टीका केली.


"ज्या संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली, त्याच संसदेच्या सभापतीची मिमिक्री होणे म्हणजे लोकशाहीचा आणि बाबासाहेबांचा अपमान आहे. विरोधाचे अनेक मार्ग आहेत, तरीही मिमिक्रीच करायची होती तर तुमच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये बसून करा", असा हल्लाबोल ज्योती वाघमारे यांनी केला.


राहुल गांधी भारताचा पप्पू


"भारताचा पप्पू असलेला राहुल गांधी या घटनेचा व्हिडिओ करतो, या लोकांना भारताची कॉमेडी सर्कस करायचं आहे का? जोपर्यंत कल्याण बॅनर्जी या प्रकाराबद्दल बाबासाहेबांची आणि देशाची माफी मागणार नाही, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा  ज्योती वाघमारे यांनी दिला. 


 "संसद, लोकशाही किंवा देशाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा विरोधकांनीदेखील राजकरण बाजूला ठेवून गांभीर्याने व्यक्त झालं पाहिजे होतं" "विरोधक बालिशपणाने बोलतायत, राजकारण मध्येचये आणून गलिच्छ कृती करतायेत. त्यामुळेच नाइलाजाने त्यांचे निलंबन करावे लागत असावे" असं ज्योती वाघमारे म्हणाल्या. 


संबंधित बातम्या