Jaykumar Gore on Abhijit Patil: हा गडी सकाळी उठतो आणि बोराटवाडीला येतो, नंतर दुपारी अकलूजला जातो, रात्री देवगिरीवर जातो आणि मध्यरात्री वर्षावर जातो. सगळ्याना म्हणतो मी तुमचाच, आता प्रश्न पडलाय हे सगळ्यालाच म्हणते मी तुमची तर ही नेमकी कोणाची अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर टीका केली आहे. याचे बोर्ड कुठे स्थिर नाही असे सांगताना हात फिरता रंगमंच आहे का असा सवाल केला. माढा तालुक्यात महापूर आला. खूप वाईट परिस्थिती होती. गावात पाणी शिरले होते. मी तिथं गेल्यावर तातडीने आयुक्तांशी बोलून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आणि मुख्यमंत्र्यांना सांगून या भागात लोकांना वाचवण्यासाठी मिलिटरी आणि हेलिकॉप्टरची व्यवस्था करायला सांगितली. हा गडी माझ्या शेजारीच उभा होतं. तिथून बाहेर पडतात याने लगेच सांगायला सुरुवात केली की मी मिलिटरी बोलवली मी हेलिकॉप्टर बोलवले, अशा शब्दात अभिजीत पाटील यांची नक्कल करीत यांनी बोलवल्यावर साध कुत्रं तरी येईल का? अशी टीका केली. 

Continues below advertisement

धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका

दुसरीकडे, भाजप आणि मोहिते पाटील गटातील वाद आता जाहीर सभांमधून उफाळून येऊ लागला आहे. पंढरपूर तालुक्यात कासेगावात झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका करत थेट इशाराच दिला आहे. सभेत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटील यांना छत दिलं. संपत चाललेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एका घराण्याला ताकद दिली. आणि आज तेच मोहिते पाटील त्यांच्या विरोधात बोलत आहेत, नाचत आहेत,  अशा शब्दांत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना टोला लगावला. फडणवीस यांनी छत काढले तर कारखान्याच्या गव्हाण बंद पडतील, आता इशारा देखील त्यांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement