सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge Case) आत्महत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी नर्तिक पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) पोलिसांच्या ताब्यात आहे. मागील आठवड्यभरापासून पोलिसांनी या प्रकरणाची तपासाची चक्र फिरवली. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे. गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आलं आहे. एवढंच नाहीतर दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते, हे सुद्धा तपासातून उघड झालं आहे.(Govind Barge Case)

Continues below advertisement

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची काल (सोमवारी, ता १५) पोलीस कोठडी संपली होती. तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी तपासाबद्दल धक्कादायक माहिती कोर्टामध्ये दिली. पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या कॉल डिटेल मधून पोलिसांसमोर नवीन नवीन खुलासे आले समोर आहे.  पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे बीड व वैराग इथं वेगवेगळ्या लॉज आणि इतर  ठिकाणी एकत्र राहिल्याचं  समोर आलं आहे. एवढंच नाहीतर  पूजा  आणि गोविंद बर्गे यांच्या चॅटिंगमध्ये गोविंद बर्गे याने आत्महत्याची धमकी दिली होती. हे ही समोर आलं आहे.

याआधीच पोलिसांनी बर्गे यांनी पूजाला ७ लाखांचा पावणे दोन गुंठे प्लॉट विकत घेऊन दिल्याचं समोर आलं होतं. पण आता  पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नागरिक आणि तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतला.

Continues below advertisement

पूजा गायकवाडचा जामिनाचा मार्ग मोकळा

दरम्यान, आधी पाच दिवस आणि नंतर दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बार्शी न्यायालयाने पूजाला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली  आहे. पण पूजाला कुठेही जाता येणार नाही. तिला पोलीस  चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.  पण आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते. त्यामुळे आता पूजा गायकवाड हिची सोलापुरातील महिला कारागृहात करण्यात रवानगी करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गोविंद कला केंद्रात (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड नावाची ही नर्तिक आहे. गोविंद बर्गे हे तिचा डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले. हा प्रेमाचा खेळ दीड वर्ष सुरू होता. पण, जसे जसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले, तशा त्यांच्या अडचणी वाढल्या. पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं, मोबाईल असे अनेक गिफ्ट मागितले. प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मोबाईलही दिला होता. पण पूजाचा आता गोविंदच्या घरावर डोळा होता. तिने बर्गे यांचं गेवराईमधील राहतं घर आपल्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला. यातून दोघांमध्ये वाद झाला. गोविंदने हे करायला नकार दिला. त्यामुळे पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. एवढंच नाहीतर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती.