Siddheshwar Sugar Factory : सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) चिमणी पाडली आहे. कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे पुढील दोन वर्षे गाळप करता येणार नाही. या पाडकाममुळं साधारण एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मत कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं. धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 


मूठभर लोकांच्या विमानसेवेसाठी एखादा उद्योग बंद पाडणे खेदजनक


सोलापूरला नागरी विमानसेवा सुरु करताना अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी 15 जून रोजी प्रशासनाने पाडली आहे. त्यानंतर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सोलापुरात अतिशय घाणेरडे राजकारण झालं असून, त्याचा बळी चिमणी ठरली. मूठभर लोकांच्या विमानसेवेसाठी एखादा उद्योग बंद पाडत असतील तर खेद वाटत असल्याचे काडादी म्हणाले. पुढचे एक नाही तर किमान पुढचे दोन सीजन तरी कारखाना सुरु होईल की नाही अशी स्थिती असल्याचे धर्मराज काडादी म्हणाले.


सोलापूरच्या या चिमणीचा वाद नेमका काय आहे? या मागे राजकारण काय आहे? ते पाहुयात. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली आहे. या चिमणीमुळे सोलापूरचं वातावरण अनेकवेळा तापलेलं पाहायला मिळालं. 2014 साली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात केली. मात्र, ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा असल्याने ती पडण्याची मागणी अनेकांनी केली होती.


साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रवास


2014 साली कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात 


2017 साली महापालिकेकडून बांधकाम परवाना न घेताचं कारखान्याने चिमणीचे बांधकाम पूर्ण करत वापर सुरु केला. 



सिद्धेश्वर कारखान्याचे माजी संचालक संजय थोबडे यांनी चिमणी अधिकृत असल्याची तक्रार दाखल केली


महापालिकेच्या नोटीसीनंतर सिद्धेश्वर कारखान्याच्या प्रशासनाने हायकोर्टात धाव घेतली, मात्र हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार


2018 साली अनधिकृत चिमणी पाडण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाकडून पथक कारखान्यात गेले मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे कारवाई थांबली


सिद्धेश्वर कारखाना प्रशासन सर्वोच्च न्यायालयात गेले, साखरेच्या गाळप हंगामामुळे चिमणीवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती


सोलापुरात विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंच या संघटनाची स्थापना


2023 साली सर्वोच न्यायालकडून न्यायालयातील प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणि त्यानंतर प्रकरण पुन्हा डीजीसीएकडे वर्ग


डीजीसीएचा मुद्दा बाजूला ठेवत सोलापूर महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र सुनावणी घेत चिमणी पाडण्याचे आदेश दिले


27 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या 45 दिवसाच्या नोटीसीनंतर अखेर 15 जून पासून कारखान्याची अनधिकृत चिमणीचे पाडकाम सुरू झाले