Solapur Bjp : सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेने हटवल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. सोलापुरातील सात रस्ता परिसरात नो डिजिटल झोन असताना भाजप कार्यकर्त्यानी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. त्यामुळं महापालिकेने कारवाई करतं हे बॅनर हटवले होते.
प्रकाश घोडके असं पोलिसांसोबत वाद घालणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन
सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन आहे. त्यामुळं या परिसरात बॅनर लावण्यास मनाई आहे. असा स्थितीत कोणतीही परवानगी न घेता भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते. त्यामुळं महापालिकेने कारवाई करत हे बॅनर हटवले. यावेळी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आम्ही परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्याचं कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर ठिय्या करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सध्या आणखी एक बॅनर पालिकेतर्फे काढण्याचे काम सुरु आहे.