सोलापूर : भीमा साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या राजन पाटील गटाच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. शिवाय सर्वच अपक्षांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत स्वत: धनंजय महाडिक आणि त्यांचे पूत्र विश्वराज महाडिक देखील रिंगणात होते.  


भीमा सहकारी साखर कारखान्यावर धनंजय महाडिकांची विजयी हॅट्रिक झाली आहे. धनंजय महाडिक यांच्यासह भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व 15 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महाडिक गटाने विरोधकांचा सुफडा साफ केलाय.  राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील  यांना धूळ चारत महाडिक गटाने भीमा कारखान्यावर वर्चस्व राखले आहे. या निडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच त्यांचा मुलगा विश्वराज महाडिक देखील विजयी जाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी निकाल जाहीर केला. 


एकाच पक्षातील बडे नेते आमनेसामने 


या निवडणुकीत महाडिक गटाने विजय मिळवला असला तरी एक खास गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे भगिरथ भालके आणि विठ्ठल कारकान्याचे चेरमन अभिजीत पाटील होते. तर धनंजय महाडिक यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजन पाटील यांच्या गटात भाजपचे प्रशांत परिचारक होते. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत पक्षाला फारसे महत्व नसते. परंतु, या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. 


निकालाची आकडेवारी  


दोन्ही गटाचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते तसेच एकूण मताधिक्य  


 संस्था प्रतिनिधी गट 


धनंजय महाडिक : 31 ( महाडिक पॅनल) 


 राजेंद्र चव्हाण : 12 ( राजन पाटील गट) 


: मताधिक्य : 19 मते 


पुळूज व्यक्ती उत्पादक गट 


विश्वराज महाडिक :  10,629 (महाडिक पॅनल)


देवानंद गुंड : 4103 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य : 6526) 


पुळूज व्यक्ती उत्पादक गट 


बिभीषण वाघ : 10237 (महाडिक पॅनल)


कल्याणराव पाटील : 4172 (राजन पाटील पॅनल)  


( मताधिक्य - 6065 ) 


टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट  


संभाजी कोकाटे : 10588  (महाडिक पॅनल)


शिवाजी भोसले : 4170  (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य - 6418 )


टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट  


सुनील चव्हाण : 10563 (महाडिक पॅनल)


राजाराम माने : 3978 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य - 6585 )


सुस्ते व्यक्ती उत्पदक गट :


तात्यासाहेब नागटिळक : 10764  (महाडिक पॅनल)


पंकज नायकुडे : 4251 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य - 6513) 


 सुस्ते व्यक्ती उत्पदक गट 


संतोष सावंत : 10138 (महाडिक पॅनल)


विठ्ठल रणदिवे : 3984 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य : 6154 )
 


अंकोली व्यक्ती उत्पदक गट  


सतीश जगताप : 10190 (महाडिक पॅनल)


भारत पवार : 3995 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य : 6195 ) 


गणपत पूदे : 10031  (महाडिक पॅनल)


रघुनाथ सुरवसे : 3865 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य - 6166) 


कोन्हेरी गट :


राजेंद्र टेकळे  : 10571 (महाडिक पॅनल)


कुमार गोडसे  : 4374 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य - 6197 )


 अनुसूचित जाती जमाती गट 


बाळासाहेब गवळी  : 10746 (महाडिक पॅनल)


भारत सुतकर : 4217 (राजन पाटील पॅनल)


( मताधिक्य : 6259) 


 महिला राखीव 


सिंधू जाधव : 10778 (महाडिक पॅनल)


अर्चना घाडगे :  4141 (राजन पाटील पॅनल)


( मतधिक्य  - 6637)


महिला राखीव गट   


प्रतीक्षा शिंदे : 10292  (महाडिक पॅनल)


सुहासिनी चव्हाण : 4022 (राजन पाटील पॅनल)


( मतधिक्य - 6270 ) 


इतर मागास प्रवर्ग गट  


अनिल गवळी : 10864 (महाडिक पॅनल)


राजाभाऊ भंडारे : 4159 (राजन पाटील पॅनल)


( मतधिक्य : 6705)


भटक्या विमुक्त जाती जमाती 


 सिद्राम मदने : 10778 (महाडिक पॅनल)


राजू गावडे :  4149 (राजन पाटील पॅनल)


( मतधिक्य - 6629 )