सोलापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सुरू असलेल्या आंदोलनावर बार्शीतील प्रताप नलावडे यांनी पुस्तक (book) प्रकाशित केलंय. 'आंतरवाली ते मुंबई'  (Antarwali to Mumbai) हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली सराटी पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही. त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जरांगे यांच्यावर लिहण्यात आलेलं हे पहिलेचं पुस्तक आहे.


बार्शी येथील पत्रकार प्रताप नलावडे यांनी जरांगे यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे. मनोज जरांगेपाटील यांच्या एकूणच वीस वर्षांच्या आंदोलनाचा आढावाही यामध्ये घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाची आवश्यकता, आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे, कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे. यापूर्वीही मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढले.  मात्र, पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही. त्यामुळे, किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आलं असल्याचे मत प्रताप नलावडे यांनी व्यक्त केलं.


उद्या आंतरवाली सराटीत महत्वाची बैठक... 


मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती. ही मुदत संपण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाही सरकारकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे 24 डिसेंबरनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या आंतरवाली सराटी गावात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यभरातील मराठा आंदोलन सहभागी होणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. उद्याची बैठक महत्त्वाची समजली जात आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत स्वतः मनोज जरांगे देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे  राज्यभरातील मराठा समाज बांधव आणि सरकारचे लक्ष लागले आहे. या बैठकीची गेल्या आठवड्याभरापासून तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाची पुढची लढाई कशी असेल याचा निर्णय आता उद्याच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Bachchu Kadu : राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा शब्द पाळावा, अन्यथा मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उतरणार; बच्चू कडूंचा इशारा