सोलापूर : आमच्या सर्वांची जातं ही शेतकरी, शेतकऱ्यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो आहोत. आपल्या साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सची तंगती तलवार होती, पण केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी लक्ष घालून ही अडचण दूर केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी तिसऱ्यांदा कसं निवडून जातील याकडे सर्वानी पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सोलापुरात अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी आमदार रविकांत पाटील, बिज्जू प्राधाने, इरफान शेख, मंदाकिनी तोडकरी या सर्वांनी अजित पवार गटात प्रवेश केला.
तर निवडणुका होणार नाही असा खोटा प्रचार
अजित पवार म्हणाले की, काही विरोधक मोदी पुन्हा निवडून आल्यास निवडणुका होणार नाही असा खोटा प्रचार करत आहेत, पण हे साफ खोटं आहे. आपण सर्व संविधानला मानणारे आहोत. 2019 ला निवडणूक झाल्या आता 2024 मध्ये निवडणुका होत आहेत. मात्र, केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली, पण त्यांनाही पाडण्याचे काम जनतेने केले.
त्यांनी सांगितले की, मधल्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न गंभीर होता. सामोपचाराने तोडगा काढण्याचे प्रयत्न आपण केले. कुणाला दुखवण्याचा हेतू राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. आम्हाला आशीर्वाद देण्याचे काम करा, आमच्या जास्तीत जागा कशी निवडून येतील यासाठी प्रयत्न करा. मधल्या काळात आम्ही जी भूमिका घेतली, त्या आधी जी भूमिका आपण वेळोवेळी घेतल्या तेव्हा तुम्ही समर्थन दिलं. सरकार कसं चालवायचं? प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं हे आता आम्हाला समजलं आहे, पण त्यासाठी आपल्या ताकदीची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
तुम्हाला सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची असतील, तर संघटना मजबुत करावी लागेल. सोलापुरात आपण कार्यलय सुरु केलं आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने एक दिवस निवडून कार्यालयात बसावे. लोकसभा निवडणूक येत्या काळात आहेत, महायुती म्हणून सगळे वरिष्ठ बसू. काही नावांवर चर्चा झाली असून प्राथमिक नावे ठरवली आहेत, पण अंतिम निर्णय अजून व्हायचा आहे आधुनिक पद्धतीने उसाची शेती करावी लागेल, कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारा ऊस घ्यावा लागेल. आपण सरकारमध्ये गेल्यानंतर मोहोळला पाचशे कोटी रुपयांची कामे दिली आहेत. तुमच्या सर्वांच्या ताकदीने सोलापूर राष्ट्रवादीमय करू हा विश्वास देतो, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या