Solapur Weather Update : राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार(IMD Forecast), सोलापुरात काल (13 मार्च ) 40.8 अंश से  तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापुरात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून यंदाच्या मोसमतील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे.  


वाढत्या उन्हाचा पारा लक्ष्यात घेता सोलापुरातील सर्व प्राथमिक शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान तळपत्या उन्हामुळे महापालिका प्रशासनही आता ॲक्शन मोडवर आले आहे. शहरातील सर्व मनपा आणि खाजगी प्राथमिक शाळा या आता सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 या वेळेत भरवणे बंधनकारक असणार आहे. सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा चाळीशी पार झाल्याने महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तर उन्हाचा पारा वाढल्याने विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन ही महापालिका प्रशासनाने केलंय.  


 शालेय परीक्षांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून विरोध 


दुसरीकडे, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत  चालणाऱ्या ईयत्ता पहिली ते चौथीच्या शालेय परीक्षांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नागपुरात विरोध दर्शवला आहे. कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याचा शिक्षक संघटनांचा दावा आहे. यावर्षी इयत्ता पहिली ते चौथीची परीक्षा 22 एप्रिल ते 25 एप्रिलच्या दरम्यान आहे. तर पाचवी व नववी पर्यंतची परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान आहे. त्याला पण समितीचा विरोधात आहे. या काळात विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या वर असतो. हे तापमान परीक्षा योग्य वातावरणासाठी अनुकूल नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपल्या निवेदनात केला आहे. त्यामुळे या वेळापत्रकाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी शासनाकडे  केली आहे.


विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा


हवामान विभागाने पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. काल (13 मार्च) अकोला राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर होतंय. काल अकोल्याचं तापमान 41.3 अंशावर गेलंय. अकोलेकर सध्या या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झालेयेत. गेल्या आठवडाभरात अकोल्याचं तापमान सातत्यानं 39 ते 41 अंशांदरम्यान फिरंतये. काल अकोल्याचा पारा 41.3अंशांवर होताय. आजही अकोल्यात तशीच परिस्थिती आहेय. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम झालाय तो अकोला शहरातील जनजीवनावर. 


 गेल्या पाच दिवसांतील अकोल्याचं तापमान 


तारीख       तापमान (सेल्सिअस अंशांमध्ये) 


08 मार्च       39.0   
09 मार्च       39.5     
10 मार्च       39.4    
11 मार्च       39.5  
12 मार्च     41.3


इतर महत्वाच्या बातम्या