Solapur : येत्या 18 तारखेच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रवीण दादावरचा (Praveen Gaikwad) हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दिली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक निषेधार्थ 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. काल (15 जुलै) यासंदर्भात सोलापुरात बैठक सुरू असताना मोठा गोंधळ झाल्याने जन्मजेयराजे भोसले हे बैठकीतून निघाले होते. या बैठकीत जन्मजेयराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख एका तरुणाने केल्याने मोठा वाद झाला होता. या वादानंतर अक्कलकोट बंद संदर्भात जन्मजेयराजे भोसले काय भूमिका घेतात हा प्रश्न चर्चेत होता, यावर आता त्यांनी स्वत: स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच अक्कलकोट बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचा एकमताने अक्कलकोट बंदचा निर्णय
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही फेक विरोधात 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचा एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. फरार आरोपींना तात्काळ अटक करा, सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी सोलापुरातील विश्रामगृह येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीतनंतर करण्यात आली आहे. अमोल राजे भोसले यांच्या संदर्भात एका कार्यकर्त्याला गैरसमज झाला होता. या गैरसमजुतीतून हा गोंधळ उडाला. मात्र त्यानंतर बैठक सुरळीत पार पडली. यावेळी समाजाच्या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर मराठा समाज समन्वयकांनी माहिती देत 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची माहिती दिली. अक्कलकोट बंदच्या संदर्भाने नियोजन करण्यासाठी आज अक्कलकोटमध्ये नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीत जन्मजेयराजे भोसले हे देखील सहभागी होतील. अशी माहिती मराठा समाज समन्वयकांची बैठकीनंतर दिली.
चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटेचे गॉडफादर- प्रवीण गायकवाड
दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले. चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटे (Deepak Kate) याचे गॉडफादर आहेत. त्यांच्याकडून दीपक काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: तुझ्या पाठीशी आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जाहीर सभेत सांगितल्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला.
दीपक काटे आणि भाजप नेत्यांचे व्हिडीओ दाखवले. त्यापैकी एका व्हीडिओत चंद्रशेखर बावनकुळे हे दीपक काटेला उद्देशून म्हणत आहेत की, मागच्या सरकारने दीपक काटेला गुन्हेगार ठरवले होते. पण मला तुमचा गर्व आहे. तुम्ही आता काम करा, तुमच्यावर जबाबदारी देऊ. घाबरु नका, तुमच्यामागे देवेंद्र भाऊ आणि मी आहे, असे बावनकुळे या व्हीडिओत म्हणत आहेत. दीपक काटे याच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगाराला भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस पद दिले जाते. गंभीर गुन्ह्यात दीपक काटेला जामीन मिळवून देणे, हे गंभीर स्वरुपाचे आहे. संघाच्या बैठकीत बहुजन संघटना संपवण्याची रणनीती आखण्यात आली होती. त्यानुसार दीपक काटेला एक टास्क देण्यात आला आहे.असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या