Solapur Farmers Protest : कडाक्याच्या थंडीत सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन भडकू लागले असून आमरण उपोषणाला बसलेले समाधान फाटे यांची तब्येत आज सहाव्या दिवशी अत्यंत खालावल्याने आता राज्यातील शेतकरी नेते पंढरपूरकडे निघाले आहे. ऊसाला साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी गेले सहा दिवसापासून समाधान फाटे आणि त्यांचे तीन सहकारी वाखरी पालखीतळावर आमरण उपोषणाला बसले आहेत.

Continues below advertisement

दरम्यान, सहाव्या दिवशी त्यांची तब्येत खूपच नाजूक झाली असून त्यांनी उपचार घेणे आज पासून थांबवली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू न देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Solapur News: आता जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू न देण्याचा इशारा

Continues below advertisement

सोलापूर जिल्ह्यातील ऊस शेजारील सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर आणि पुणे जिल्ह्यात निरा भिमा सारख्या कारखान्यांना जाऊ लागल्याने तेथे त्याला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळू लागली आहे. यामुळे संतप्त होऊन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी सीताराम आणि पांडुरंग सहकारी साखर कारखाना बंद पाडल्यावर दोन्ही ठिकाणी पहिली उचल वाढवून तीन हजार रुपये देण्यात आली आहे. या दोन ठिकाणी कारखाने बंद पडतात आंदोलनाच्या भीतीने बबनराव शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही कारखान्यावर आणि आमदार अभिजीत पाटील यांनी त्यांच्या विठ्ठल कारखान्यावर तातडीने 3000 पेक्षा जास्त उचल घोषित केली आहे.

Solapur Farmers Protest : ....तर तुम्ही काय टनामागे हजार रुपये खाणार का?

शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांना एवढी लांब वाहतूक करून जर साडेतीन हजार रुपये दर परवडत असेल तर तुम्ही काय टनामागे हजार रुपये खाणार का? असा संसप्त सवाल आंदोलन समाधान पाटील यांनी केला आहे. साखर सम्राटांकडे नवीन कारखाने विकत घेण्यात पैसा आहे, असे सांगत बोत्रे पाटील यांचे 31 कारखाने बबनदादा शिंदे यांचे सहा अभिजीत पाटील यांचे सहा दोन सीजन करून काळुंगे यांनी तीन कारखाने केल्याचा आरोप फाटे यांनी केला आहे.

Farmers Protest : जिल्ह्यातील आंदोलनाचा भडका राज्यभर पोहोचेल, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

दरम्यान आता फाट्यांची तब्येत नाजूक बनत चालली असताना शासनाने तातडीने यात हस्तक्षेप न केल्यास जिल्ह्यातील या आंदोलनाचा भडका राज्यभर पोहोचेल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून दर न देण्यासाठी तुम्ही जर कारखानदारी एक येत असाल तर आता आम्ही शेतकऱ्यांचा दर मिळवण्यासाठी सर्व संघटना एकत्र आल्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. फाटे यांची तब्येत गंभीर बनली असून शासन आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास आज राज्याचे नेते येथे पोचत असून या आंदोलनाचा भडका राज्यभर उडू शकेल असा इशाराही दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या