Uday Samant :  चिपळूण मधील वाशिष्ठी नदीतल्या गाळ उपासाबाबत आज पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सामंत यांनी अधिकाऱ्यांना चांगेलच खडसावल्याचे पाहायला मिळालं. गाळ उपसा करण्यासाठी उशिरा सुरुवात का केली ? या प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून आलेल्या उत्तरावर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. नाम फाउंडेशनचे मशिन्स येणार होते म्हणून शासनाच्या मशिन्स लावल्या नाहीत हे उत्तर झाले का ? या उत्तरावर तुमच्यावर कारवाई व्हायला पाहिज असे म्हणत सामंत यांनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. 

सामंत यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले

मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाशिष्ठी नदीतल्या गाळ उपासाबाबत आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. तुमच्यापेक्षा नाम ने दुप्पट गाळ काढला आहे असे म्हणत सामंत यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले आहे. तुम्ही कुठे कमी पडलात ते शोधा आणि काम करा असे उदय सामंत म्हणाले. चिपळूण मधील वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम संथ गतीने होत असल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी भलतीच उत्तरे दिल्याने सामंत संतापल्याचे पाहायला मिळालं. 

गाळ उपसा केल्यास नदीतील पाण्याच्या प्रवाहासाठी मदत होते

 
वाशिष्ठी नदीत गाळ उपसा केल्यास, नदीतील पाण्याच्या प्रवाहासाठी मदत होते आणि पूर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. गाळ उपसा केल्याने नदीच्या पात्राला खोली वाढते आणि त्यामुळे पाणी जास्त साठवू शकते, ज्यामुळे पूर येण्याची शक्यता कमी होते. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे, उपसलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य उपाययोजना करणे देखील आवश्यक असल्याची माहिती काही तज्ज्ञांनी दिली आहे. जेणेकरून नदीतील गाळ पुन्हा साचणार नाही आणि नदीचा प्रवाह कायम राहील. पावसाळ्यानंतर विविध कारणांनी पुन्हा नदी गाळ साचण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे काढलेल्या गाळाचा पाहिजे त्या प्रमाणात परिणाम दिसून येत नाही. त्यामुळं गाळाची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावणं गरजेचं असल्याची माहिती काही तज्ज्ञांनी दिली आहे.  
 

महत्वाच्या बातम्या:

राज ठाकरे शाळकरी मुलांप्रमाणे तडजोड करतील असं वाटत नाही; बंधूंच्या युतीवर मंत्री सामंत म्हणतात...