Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर (Shiroda Velagar beach) पर्यटनासाठी आलेले 9 जण समुद्रात बुडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. या घटनेत आतापर्यंत 5 पर्यटकांचे मृतदेह सापडले असून, दोघे पर्यटक सुखरूप वाचले आहेत. उर्वरित दोन पर्यटक अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
Sindhudurg News : घटनेचा तपशील
ही दुर्घटना दोन दिवसांपूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील वेळागर समुद्र किनारी घडली. बेळगाव आणि कुडाळ येथून आलेले कित्तूर व मणियार कुटुंबीय पर्यटनासाठी किनाऱ्यावर आले होते. समुद्रातील पाण्याचा अंदाज न घेता हे पर्यटक सायंकाळच्या सुमारास समुद्द्रात उतरले असताना अचानक उंच लाटा उसळल्या आणि 9 जणांना समुद्राने गिळंकृत केले.
Sindhudurg News : पाण्यात ओढले गेले पर्यटक
सायंकाळी सुमारे चार वाजता समुद्रात उतरल्यानंतर काही क्षणांतच पर्यटक खोल पाण्यात ओढले गेले. मोठ्या आक्रोशानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि काही पर्यटकांना समुद्रातून बाहेर काढले. यामध्ये इम्रान कित्तूर स्वतः पोहत बाहेर आला, तर 17 वर्षीय इसरा इम्रान कित्तूर हिला गंभीर अवस्थेत वाचवण्यात आले असून तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sindhudurg News : पाच पर्यटकांचे मृतदेह सापडले
या दुर्घटनेत आतापर्यंत पाच पर्यटकांचे मृतदेह सापडले असून, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
फरहान इरफान कित्तूर (वय 34, रा. लोंढा, बेळगाव)
इबाद इरफान कित्तूर (वय 13, रा. लोंढा, बेळगाव)
नमीरा आफताब अख्तर (वय 16, रा. अल्लावर, बेळगाव)
इक्वान इम्रान कित्तूर (वय 15, रा. लोंढा, बेळगाव)
फरहान मोहम्मद मणियार (वय 20, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग)
Sindhudurg News : बेपत्ता असलेल्या पर्यटकांची नावे
इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय 36, रा. लोंढा, बेळगाव)
जाकीर निसार मणियार (वय 13, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग)
हे दोघे अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
Sindhudurg News : वाचलेले पर्यटक
इसरा इम्रान कित्तूर (वय 17, रा. लोंढा, बेळगाव) – उपचार सुरू
इम्रान कित्तूर (रा. लोंढा, बेळगाव) – स्वतः पोहत बाहेर
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, Video:
इतर महत्त्वाच्या बातम्या