एक्स्प्लोर

Nagpur News : चिंताजनक! मेंदूज्वर सदृश्य संशयित आजाराचा धोका वाढला; नागपुरात मृत बालकांचा आकडा 10 वर, NIV रिपोर्ट कधी येणार?

Nagpur News : पालकांची चिंतेत अधिक भर घालणारी बातमी समोर आली आहे. नागपुरात मेंदूज्वर सदृश्य संशयित आजाराने मृत बालकांचा अधिकृत आकडा आता 10 वर पोहोचला आहे.

Nagpur News : पालकांच्या चिंतेत अधिक भर घालणारी बातमी समोर आली आहे. नागपुरात मेंदूज्वर सदृश्य संशयित आजाराने मृत बालकांचा अधिकृत आकडा आता 10 वर पोहोचला आहे. नागपूरच्या (Nagpur News) एका खाजगी रुग्णालयात मध्यप्रदेशातील परासिया येथील दोन वर्षी बालिकेचा शनिवारी (4 ऑक्टॉबर) मृत्यू झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यातील मेंदूवर सदृश आजाराने मृत बालकांची संख्या 10 झाली आहे. 10 पैकी 5 मृत बालक (Nagpur Children Death News) महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील असून ते नागपुरात उपचारासाठी आले होते. तर उर्वरित 5 बालक मध्यप्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आले होते.

दरम्यान, या बालकांच्या मृत्यूंचे गूढ अजून ही कायम आहे. कारण त्यांचे मृत्यू "ॲक्युट एन्सेफेलायटिस सिंड्रोम"मुळे झाल्याचे संशय असताना त्या संदर्भातील विविध टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. दरम्यान, यापैकी काही बालकांचे नमुने 'एनआयव्ही' (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) ने घेतले असले तरी त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही, तो कधी येईल ते ही सध्या स्पष्ट नाही.

नागपूरच्या विविध रुग्णालयांत 14 रुग्ण दाखल (Children Death Reason Unknown)

एकीकडे गेल्या दोन महिन्यात 10 बालकांचे मृत्यू नेमके कोणत्या आजाराने झाले? याबाबत अजून संभ्रम कायम असताना, अजून ही नागपूरच्या विविध रुग्णालयांत 14 रुग्ण दाखल आहेत. मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. तर बालकांच्या या आजारामुळे काही प्रश्नही आता निर्माण झालेले आहे.

Nagpur Mystery Death: 10 मुलांच्या मृत्यूचं गूढ कायम, NIV रिपोर्ट कधी येणार?

- 10 बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?

- विदर्भ आणि मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरात संशयित ए इ एस या मेंदूज्वराचे (Acute Encephalitis Syndrome) रुग्ण सापडत आहे का?

- असे असताना एइएस जापानी एन्सेफेलायटिस आणि चांडीपुरा व्हायरस चे चाचणी अहवाल नकारार्थी? मग मृत्यूचे नेमके कारण काय?

- पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (NIV) तपासणी अहवाल केव्हा येणार?

छिंदवाडा येथे स्थानिक खोकल्याच्या सिरप पुरवठ्याची चौकशी (Inquiry into local cough syrup supply in Chhindwaran)

मिळालेल्या माहितीनुसार, खोकल्याच्या सिरपचा नमुना चाचणीसाठी तामिळनाडूतील एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. चाचणी अहवालाच्या आधारे, कोल्ड्रिंक सिरपवर आता बंदी घालण्यात आली आहे. जबलपूर किरकोळ विक्रेता आणि छिंदवाडा येथील स्थानिक पुरवठादाराची चौकशी केली जात आहे. संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे आणि राज्यभरातील संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
Embed widget