सिंधुदुर्गमालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, राजन साळवी, वैभव नाईक विनायक राऊत हे किल्ल्यावर दाखल झाले होते. त्याचवेळी भाजपचे खासदार नारायण राणे, निलेश राणे समर्थकांसह तिथून पाहणी करुन जात होते. त्याचवेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली. जयंत पाटील यांनी हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी प्रयत्न केला. जयंत पाटील यांच्याकडून नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याशी चर्चा केली. यानंतर ते जयंत पाटील आदित्य ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. 


तुम्ही गेलात की ते 10 मिनिटात निघतील : जयंत पाटील


दोन्ही गटात वाद सुरु झाल्यानंतर दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दोन्ही गटांशी चर्चा करुन वाद शांत करण्याचं काम जयंत पाटील करत आहेत. जयंत पाटील यांनी प्रथम निलेश राणे आणि नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. नारायण राणे यांनी ठाकरे गटानं मागील बाजूनं बाहेर जावं अशी भूमिका घेतली. तर, जयंत पाटील यांनी तुम्ही इथून बाहेर गेलात तर ते पुढच्या 10 मिनिटात बाहेर जातील, असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे आणि मविआच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. 


दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक 


नारायण राणे यांचे समर्थक आणि शिवसैनिक यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही बाजूंनी कुणीच ऐकायला तयार नसल्याचं चित्र आहे. पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनानं दोन्ही गटांशी चर्चा सुरु केली आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांची समजूत काढताना पोलिसांची दमछाक होत आहे. पोलिसांनी वाद रोखण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. गेल्या एक तासापासून राजकोट किल्ल्यावर राजा सुरुच आहे.


उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद


महाविकास आघाडीची मुंबईत बैठक सुरु होती. याचवेळी राजकोट किल्ल्यावर शिवसैनिक आणि राणे समर्थक आक्रमक झाल्यानं मविआच्या नेत्यांची तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करतील, अशी माहिती आहे. 


इतर बातम्या :


Shivaji Maharaj statue : मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने