Narayan Rane On Aaditya Thackeray:  दिशा सालियान (Sushant Singh Disha Salian Case) प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यात राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पुन्हा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. 


सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg News) बोलताना नारायण राणे म्हणाले की, सुशांत सिंह आणि दिशा सालियानचं (Sushant Singh Disha Salian Case) नाव आलं की आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) चवताळले. दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते, सोडणार नाही. आता सत्ता भाजप आणि शिंदे गटाची आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे म्हणाले. यापूर्वीही नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणावरुन आरोप केलेले आहेत. 
 
दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य कोर्टात जाणार-सूत्र


दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बदनामी करणाऱ्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे या संदर्भात कायदेशीर सल्ला घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे.


दिशा सालियन प्रकरणी गृहमंत्र्यांकडून सभागृहाची दिशाभूल- नाना पटोले


नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत या दोन्ही प्रकरणाची चौकशी झाली. या दोन्ही घटनामध्ये आत्महत्या असल्याचा उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये सीबीआयने न्यायालयात सादर केला आहे. तर, राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयने केलाच नाही. त्यामुळे आम्ही एसआयटी बसवत असल्याचे सांगितले. दिशा सालियन प्रकरणी सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग प्रस्ताव  आणणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. जर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला तर, एसआयटी चौकशीची गरज काय? असा थेट प्रश्न नाना पटोले यांनी गृहमंत्री फडणवीस यांना केला आहे.


ही बातमी देखील वाचा