Vaibhav Naik : शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दसरा मेळाव्यादिवशी फोन करुन शिंदे शिवसेनेत प्रवेश करा म्हणून सांगितलं होतं. निलेश राणेंचं (Nilesh Rane) नाव न घेता त्यांचा प्रवेश घेतला नाही असंही सांगितलं होतं. मात्र, मी स्वार्थासाठी तिकडे गेलो नसल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केलं. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर मला थांबावंस वाटलं होतं. मात्र, पराभवानंतर मला मी सर्वसामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी असल्याची जाणीव झाली, म्हणूनच पुढे काम करायचं ठरवल्याचे वैभव नाईक म्हणाले.
माझ्या पराभवाचा दोष पैसे किंवा evm ला दिला नाही
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी त्यांचा पराभव केला आहे. याबबत बोलताना वैभव नाईक म्हणाले की, माझ्या पराभवाचा दोष पैसे किंवा evm ला दिला नाही असे नाईक म्हणाले. मतदाना दिवशी विरोधक म्हणाले होते बटण दाबा आणि खात्यात 2100 जमा करुन घ्या. मात्र आता लाडक्या बहिणींना दिवाळीनंतर 2100 रुपये देणार असं म्हणाले होते. अद्याप दिले नाही. त्यामुळं याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवला पाहिजे असेही नाईक म्हणाले.
आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरु
दरम्यान, काल वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. यामध्ये निलेश राणे यांना इशारा देखील दिली होता. आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आमदार निलेश राणेंना (Nilesh Rane) दिला आहे. जर उगाच कोणी त्रास दिला तर माझ्या सोबत 72 हजार लोक आहेत, त्यांना घेऊन रस्त्यावर उतरु हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही वैभव नाईक म्हणाले. आपला पराभव कशामुळे झाला हे निकालादिवशी समजलं आहे. त्यामुळे आपण चिंतन करण्यासाठी नाही तर पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्यासाठी ही बैठक घेतल्याचे वैभव नाईक (Vaibhav Naik ) म्हणाले. शिवसेनेला संघर्ष नवा नाही. माझ्यासमोर राजकारणात, समाजकारणात यापुढे राहायचं की नाही हा प्रश्न होता. मी कारण न देता पराभव स्वीकारला. जो जिता वही सिकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. आता मला आमदार म्हणून हाक मारू नका तर वैभव नाईक म्हणून हाक मारा. आमदार हे पद आयुष्यभर मलाच भेटेल असा टीळा लावून कोणी येत नाही. आपल्या सोबत जी लोकं राहतील त्यांना घेऊन काम करायचा निश्चय केला. माझ्या पराभवाने राज्यातील अनेक लोक हळहळले, त्यांनी अनेकांनी फोन केले, हाच माझा विजय असल्याचे नाईक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
माझ्यासोबत 72 हजार लोक, कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर सर्वांना घेऊन रस्त्यावर उतरणार, वैभव नाईकांचा निलेश राणेंना इशारा