Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (42) हिचं निधन (Shefali Jariwala Death) झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेफालीची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यांनी यांनी तिला कूपर रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती आली आहे. शेफालीची एक्स (आधीचे ट्विटर) वरील शेवटची पोस्ट सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) याच्याबद्दल होती. माझ्या मित्रा, आज मी तुझा विचार करतेय, असं शेफाली 2 सप्टेंबर 2024 रोजी केलेल्या या पोस्टमध्ये म्हणाली होती. ज्याला ती अनेक वर्षांपूर्वी डेट करत होती. शेफाली यापूर्वी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला डेट करत होती. शो दरम्यान तिचे हे आधीचे नाते उघड झाले होते. 

शेफालीचे सिद्धार्थसोबत नाते कसे होते?

शेफाली यापूर्वी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला डेट करत होती. शेफालीने दिलेल्या एका मुलखातमीमध्ये बिग बॉसच्या शोनंतर सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. आमच्या आवडी सारख्याच आहेत, आम्ही प्रवास, जागा, बुलेट ट्रेन आणि इतर गोष्टींबद्दल बोलायचो. आम्ही डेटिंग करणे थांबवले तरीही, जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांना भेटायचो तेव्हा आम्ही नेहमीच चांगल्या पद्धतीने वागायचो, असं शेफाली सिद्धार्थबाबत म्हणाली होती. 

कोण आहे शेफाली जरीवाला?

शेफाली जरीवाला हिचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता. शेफाली जरीवाला अनेक रिअॅलिटी शोज, चित्रपट, गाण्यांचे अल्बममध्ये दिसून आली होती. नच बलिए 5 आणि नच बलिए 7 मध्येही शेफाली जरीवालाने सहभाग घेतला होता. 2019 मध्ये बिग बॉस 13 मध्येही स्पर्धेक म्हणून शेफाली दिसली होती. 

शेफाली जरीवालाचा 2009 मध्ये झाला होता घटस्फोट-

शेफाली जरीवालाचे दोन लग्न झाले होते. तिचे पहिले लग्न 2004 मध्ये मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झाले होते, परंतु 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफाली जरीवालाने संगणक अनुप्रयोगात पदवी प्राप्त केली होती.

संबंधित बातमी:

Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा गर्ल' अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं 42 व्या वर्षी निधन; मनोरंजन क्षेत्रात हळहळ