पुणे:  राज्यभरातील शेतकरी आज संपावर आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर ओतून निषेध नोंदवला.


माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेतकरी संपावरुन हळहळ व्यक्त केली आहे.

"आज मी अस्वस्थ आहे, कारण देशभरात आज शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्या कष्टाच्या गोष्टींचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्य ते करावं. राज्य आणि देशातील राज्यकर्त्यांनी शहाणपणाचा निर्णय लवकर घ्यावा आणि खऱ्या अर्थानं बळीराजाचं राज्य आणावं एवढंच मला आज वाटतं" असं पवार म्हणाले.

पुण्यात शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूण झाले आहेत. त्यानिमित्त शरद पवार यांच्यासोबत काम केलेल्या महिला-भगिनींच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी शेतकरी संपावर भाष्य केलं.

संबंधित बातम्या 

LIVE UPDATE : राज्यातील बळीराजा संपावर 

शेतकरी संपावर, दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या

शेतकरी संपाला हिंसक वळण, व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण 

शेतकरी संप : साताऱ्यात मुंबईला दूध घेऊन जाणारे दोन ट्रक फोडले