Sharad Pawar : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर अवघ्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर गंभीर आरोप होत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करणे, खोट्या केसेस दाखल करण्याचा सुद्धा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बीड दौरा करणार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार आहेत.


परभणीमध्ये मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह धरणे आंदोलनस्थळी सुद्धा शरद पवार भेट देणार आहेत. तसेच विजय वाकोडे यांच्या घरीही जाऊन सांत्वनपर भेट घेणार आहेत. शरद पवार 21 नोव्हेंबर रोजी शनिवारी शरद पवार बीड आणि परभणी दौऱ्यावर असतील. पवार पहिल्यांदा मस्साजोग आणि नंतर परभणीला भेट देणार आहेत. पवार देशमुख कुटुंबीयांची घेणार भेट घेत परिस्थिती जाणून घेणार आहेत.  


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याची चौकशी निष्पक्ष व्हावी 


दरम्यान, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज (19 डिसेंबर) नांदेडमध्ये सकल मराठा समाजाकडून निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देत एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे त्यात कुठल्याच राजकीय दबाव न आणता निष्पक्ष सखोल चौकशी करून गुन्हेगाराचा खरा चेहरा समोर आणावा अशी मागणी करण्यात आली. 


जिंतूरात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आसूड मोर्चा


दुसरीकडे, संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलिसच गुन्हेगाराना पाठीशी घालत आहेत शिवाय गुन्हेगावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्ह्यातील आरोपी आजही फरार आहेत. म्हणून घटनेचा निषेध करून गुन्ह्यातील सर्व आरोपीना अटक करावी, घटनेचा मुख्यसूत्रधार शोधावा, खून खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आसूड मोर्चा बाजार समितीच्या मैदानांवरून मुख्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक येथून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालया समोर मोर्चा धडकला. यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत येत्या काही दिवसात सर्व आरोपी अटक झाले नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला.


इतर महत्वाच्या बातम्या