Yearly Numerology 2025 Of Mulank 5 : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष आपल्यासाठी नेमकं कसं असेल? ठरवलेले संकल्प पूर्ण होतील की नाही अशा बऱ्याच शंका मनात असतात. याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार (Numerology) कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो.
या ठिकाणी आपण मूलांक 5 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 5 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांकसाठी कसं असेल ते जाणून घेऊयात.
कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Luv Life Numerology 2025)
मूलांक 5 च्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. सुरुवातीचा काळ चढ-उतारांचा असेल. पण, नात्यात हळूहळू प्रेम आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर नवीन योजना आखू शकता. तसेच, पार्टनरशिपमध्ये नवीन व्यवसाय सुरु करु शकता. तुमच्या जोडीदाराच्याही मनाचा आदर राखा. त्यांना देखील व्यक्त होऊ द्या.
कसं असेल करिअर? (Yearly Career Numerology 2025)
नवीन वर्ष मूलांक 5 साठी करिअरच्या दृष्टीने फार शुभकारक असणार आहे. या वर्षात तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, जून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. या वर्षात तुम्हाला विविध स्त्रोतांमधून पैशांचे स्त्रोत मिळतील. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी शुभ असणार आहे.
कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2025)
तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, वर्षाच्या सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्याने तुमची चिडचिड होऊ शकते.पण, सप्टेंबरच्या नंतरचा काळ तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे. या काळात तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. तसेच, गुंतवणुकीचे अनेक नवीन पर्याय तुमच्यासमोर उभे राहतील.
कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2025)
आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंतचा काळ तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक असू शकतो. या काळात तुमचे दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतात. चेहऱ्याच्या संबंधित आजार किंवा सांधेदुखीच्या त्रासाने तुम्ही त्रस्त असू शकता. मात्र, एप्रिलच्या नंतरचा काळ तुमच्यासाठी फार चांगला असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :