Shankaracharya Swami pragyanand Saraswati : शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी महाराष्ट्रातील जैन मुनी यांनी मागच्या काही दिवसात घेतलेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. अहिंसा परम धर्म सांगणाऱ्या जैन धर्माचे (Jain Community) जैन मुनी हिंसेचे समर्थन आहे, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील जैन मुनींचे वर्तन हिंसेचे समर्थन करणाऱ्या अराजक तत्वाप्रमाणे दिसत आहे. मात्र आपल्याकडे धर्मव्यवस्था आणि संविधानिक न्याय व्यवस्था या दोन वेगवेगळ्या आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाने राममंदिर घेतले, मथुरा काशीची लढाई सुरु आहे. हे जैन मुनींनी समजून घ्यायला हवे. असे मत शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज (Shankaracharya Swami pragyanand Saraswati Maharaj) यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

Continues below advertisement

कबुतरखाना (Kabutar Khana) संदर्भात न्यायालयाचा आदेश असतांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात जैनमुनी हिंसेचे समर्थन करतात. मग त्यांच्यासारखे हिंसक कोणी असू शकत नाही? असा सवाल शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज (Shankaracharya Swami pragyanand Saraswati Maharaj) यांनी उपस्थित केला.

फडणवीस सरकार हटवण्याचे समर्थन करतात, आम्ही याची निंदा करतो

Continues below advertisement

जे मुनी कठोर शब्दाची भाषा करता, जे हिंसेचे समर्थन करतात, जे अराजकतेचं समर्थन करता, देवेंद्र फडणवीस सरकार हटवण्याचे समर्थन करतात आम्ही याची निंदा करत असल्याचे शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज म्हणाले. कबुतरखाने हे उद्यानात असायला पाहिजे, जंगलात असायला पाहिजे. मानवी वस्तीत नागरिकांना त्याचा त्रास असेल हे न्यायालय पण मान्य करत असेल तर जैन मुनींची भूमिका स्वीकार केली जाऊ शकत नसल्याचे हि शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज म्हणाले.

कथाकथित शंकराचार्य फडणवीस-शिंदे यांच्या दरी निर्माण करण्याचे काम करता

अवमुक्तेस्वरांनंद सारखे कथाकथित शंकराचार्य बिहारमध्ये जाऊन जात व धर्माच्या आधारे विभाजन करत आहे. गो-माता विषमता असतांना त्यांनी महाराष्ट्रात गो-मातेला राजमातेचा दर्जा दिला. अवमुक्तेस्वरांनंद सारखे कथाकथित शंकराचार्य देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या दरी निर्माण करण्याचे काम करतात.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत अजूनही वेळ गेलेली नाही

उद्धव ठाकरे यांच्याबाबत अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी परत सनातनच्या मार्गावर यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सनातनच्या मार्ग स्वीकारायला पाहिजे. वेगळी भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांनी सनातन व बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अपराध केला आहे. फक्त सत्तेसाठी उद्धव ठाकरे जयचंदांन सोबत आहे. सद्या राज ठाकरे द्विगभ्रमात आहे. राज ठाकरे यांना बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून बघितले जाते. त्यांनी आपल्या भूमिकेतून ते जनतेला दाखवून द्यायला पाहिजे. असेही शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज म्हणाले.

संबंधित बातमी: