Actor Did 55 Roles In One Serial: हिंदी टेलिव्हिजन आणि फिल्मी जगताचा दिग्गज अभिनेता सतीश शाह यांनी काही दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. त्यांचं अकाली जाणं फिल्म जगताला खूप मोठा धक्का होता. पण, तरीसुद्धा त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमधून ते कायम चाहत्यांच्या मनात असतील. त्यांनी आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. पण, त्यातल्या त्यात त्यांच्या काही गाजलेल्या भूमिकांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांची दूरदर्शनवरच्या क्लासिक सीरियल 'ये जो है जिंदगी'. 

Continues below advertisement

1984 मध्ये प्रसारित करण्यात आलेल्या या मालिकेनं ना फक्त टेलिव्हिजन जगताला नवी दिशा दिली, तर सतीश शाह यांना प्रत्येक घराचा चाहता बनवलं. खास गोष्ट म्हणजे, एकाच मालिकेत त्यांनी 55 भूमिका साकारलेल्या, ज्याकडे आजही एक रेकॉर्ड म्हणून पाहिलं जातं. 'ये जो है जिंदगी' टेलिव्हिजन जगताचे दिग्दर्शक कुंदर शाह होते, आणि मुख्य भूमिका शफी इनामदार, स्वरूप संपत, राकेश बेदी, सतीश शाह आणि सुलभा आर्य यांनी साकारलेल्या. 

'ये जो है जिंदगी' सीरियलचा प्राण सतीश शाह होते, असं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये ते वेगवेगळे पाहुण्यांच्या भूमिकेत दिसून यायचे. कधी डॉक्टर, कधी वकील, कधी शेजारी, तर कधी नातेवाईक. त्याचा कॉमिक टायमिंगन आणि एक्सप्रेशंसनं प्रेक्षकांची मनं जिंकली, प्रेक्षकांना खळखळून हसवलं. एकूण 67 एपिसोड्समध्ये जास्त करुन सतीश शाह यांचे वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या, ज्या तब्बल 55 होत्या. 

Continues below advertisement

सहज एक डायलॉग म्हटला अन् नशीब पालटलं... (Satish Shah 55 Roles Yeh Jo Hai Zindagi)

सीरिअलचा सर्वात फेमस डायलॉग होता, "30 ईयर्स का एक्सपीरियंस है..." ही लाईन सतीश शाह यांनी एक भूमिका साकारताना म्हटलेली. त्या भूमिकेत मीच कसा एक्सपोर्ट हे ते पात्र वारंवार सांगत होतं. नेमकं हेच, प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. हा डायलॉग एवढा पॉप्युलर झाला की, आजही मीम्स आणि दररोजच्या गोष्टींमध्ये  वापरला जातो. आयएमडीबीनं दिलेल्या माहितीनुसार, या डायलॉगचे क्रिएटर स्वतः सतीश शाह होते. या शो मार्फत त्यांनी कॉमेडीच्या जगतात आपलं पाऊल ठेवलं आणि नंतर कॉमेडी अॅक्टर म्हणून नावारुपाला आले. 

'साराभाई वर्सेज साराभाई'मध्ये भूमिका साकारुन ते अगदी घराघरांत पोहोचले. सतीश शाह यांचा इंडस्ट्रीतला प्रवास 1980 च्या दशकात सुरू झाला. 'जाने भी दो यारो' (1983) मध्ये  म्युनिसिपल कमिश्नर डी'मेलो ही भूमिका आणि 'ये जो है जिंदगी' (1984) मध्ये 55 वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. त्यानंतर 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'फना' आणि 'ओम शांति ओम' यांसारख्या फिल्ममधले त्यांचे डायलॉग्स आजही खळखळून हसवतात. सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sudhir Dalvi Critical Family Appeals For Financial Help: 'शिर्डी के साईं बाबा' फेम अभिनेता मृत्यूच्या उंबरठ्यावर; गंभीर आजाराच्या उपचारासाठी पैसेच नाहीत, मदतीचं आवाहन