Four Big Mistakes Seen In Shah Rukh Khan Pathaan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण या सिनेमातील काही चुकांनी मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 
 
किंग खान (King Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमातील एका दृश्यात जॉन अब्राहमसोबत (John Abrham) मारामारी करताना दिसत आहे. मारामारी करतानाच्या एका फ्रेममध्ये शाहरुख जॉनपेक्षा मोठा दाखवला आहे. तर दुसऱ्या फ्रेममध्ये जॉन मोठा दाखवला आहे. 



शाहरुख-जॉनच्या मारामारी प्रसंगादरम्यान शाहरुखचे छोटे केस दाखवण्यात आले आहेत. त्यानंतरच्या दुसऱ्याच प्रसंगात त्याचे लांबलचक केस हवेत उडताना दाखवले आहेत.


 


'पठाण' सिनेमातील एका दृश्यात शाहरुख खान एका दगडावरुन टँकरवर बाईक उडवताना दिसत आहे. पण दुसऱ्या फ्रेममध्ये हा दगड गायब झालेला आहे. त्यामुळे अचानक हा दगड कुठे गायब झाला असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 



शाहरुख खान पुढे बाईकवरुन खाली येत टँकरच्या खिडकीत बॉम्ब फेकताना दिसत आहे. पण त्याच्या आधीच्या दृश्यात शाहरुखचे दोन्ही हात बाईकवर होते. त्यामुळे अचानक हातात बॉम्ब कुठून आला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 



बादशाहसाठी काहीही!


शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याचे चाहते त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या दिवशी शाहरुखचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहात गर्दी केली आहे. अनेक सिनेमागृहांत 'पठाण'चे (Pathan Movie) खास शो आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे 'पठाण' सिनेमातील चुकांकडे दुर्लक्ष करत चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहायला जात आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील 'पठाण' सिनेमावर भाष्य करत आहेत. बंद बडलेले सिनेमागृह पुन्हा सुरू करण्याचं काम शाहरुखच्या 'पठाण'ने केलं आहे. 'बादशाहसाठी काहीही' असं म्हणत चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. 






संबंधित बातम्या


Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : 'पठाण'ची उत्सुकता शिगेला; पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई!