Stock Market Closing : सलग पाच दिवस घसरणीसह बंद झाल्यानंतर आज गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. भारतीय शेअर बाजार आज वधारत बंद झाला. आज दिवसभरातील व्यवहारात बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून आली होती. मात्र गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आणि काही प्रमाणात तेजीसह बंद झाला. आज दिवसभरातील व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 79 अंकांनी वधारत 57,634 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांनी वधारत 16,985 अंकांवर बंद झाला.

सेक्टरमध्ये काय स्थिती?

आज दिवसभरातील व्यवहारात एफएमसीजी, एनर्जी, बँकिंग, फार्मा, मीडिया, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. ऑटो सेक्टरमध्येही खरेदीचा जोर दिसून आला. मात्र, आयटी, मेटल्स सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिडकॅप स्टॉक्सदेखील तेजीसह बंद झाले. तर, स्मॉल कॅपमध्ये घसरण दिसून आली. 

इंडेक्‍सकिती अंकावर बंददिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex57,689.5257,887.4657,158.6900:03:19
BSE SmallCap26,986.4727,121.8226,704.95-0.67%
India VIX16.2217.3613.95-0.48%
NIFTY Midcap 10029,997.5030,092.3529,598.7000:01:18
NIFTY Smallcap 1009,032.559,070.608,925.15-0.52%
NIfty smallcap 504,091.654,103.504,038.45-0.38%
Nifty 10016,852.2516,923.8516,696.2500:02:18
Nifty 2008,854.308,890.608,767.6500:02:10
Nifty 5016,985.6017,062.4516,850.1500:01:09

 

या स्टॉक्समध्ये तेजी-घसरण

आजच्या व्यवहारात नेस्ले 2.54 टक्के, एशियन पेंट्स 2.32 टक्के, एचयूएल 2.23 टक्के, टायटन कंपनी 2.21 टक्के, सन फार्मा 1.66 टक्के, पॉवर ग्रिड 1.60 टक्के, एसबीआय 1.35 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. टाटा स्टील 3.31 टक्क्यांनी, इंडसइंड बँक 2.31 टक्क्यांनी, भारती एअरटेल 0.98 टक्क्यांनी, इन्फोसिस 0.93 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत थोडीशी उडी

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप र 256.21 लाख कोटींवर पोहोचले आहे. तर, बुधवारी मार्केट कॅप  255.90 लाख कोटी होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 31,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.