Share Market Closing Bell :  शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्समध्ये (Sensex) 500 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी (Nifty) 170 अंकांची घसरण झाली. मात्र, व्यवहाराच्या शेवटच्या एक तासात बाजाराने नीचांकी अंकांपासून उसळण घेत सावरला. निफ्टी 200 अंकांनी सावरला तर, सेन्सेक्स 700 अंकांनी सावरला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आज दिवसभरातील व्यवहारात आयटी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. या दोन्ही सेक्टरशिवाय, मीडिया आणि एनर्जी सेक्टरमध्ये ही तेजी दिसून आली. तर, बँकिंग, ऑटो, फार्मा, मेटल्स, रिअल इस्टेट, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 13 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 मधील 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. 

 

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,401.92 65,517.82 64,821.88 0.12%
BSE SmallCap 35,113.21 35,213.85 34,710.86 -0.50%
India VIX 12.00 12.76 10.48 4.10%
NIFTY Midcap 100 37,770.20 37,838.15 37,258.60 -0.17%
NIFTY Smallcap 100 11,662.40 11,728.30 11,516.20 -0.73%
NIfty smallcap 50 5,335.05 5,346.05 5,255.95 -0.47%
Nifty 100 19,330.80 19,363.55 19,153.70 -0.15%
Nifty 200 10,289.15 10,306.55 10,188.40 -0.15%
Nifty 50 19,434.55 19,465.85 19,257.90 0.03%

 

गुंतवणुकदारांना एक लाख कोटींचा फटका 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात घसरण झाली. आज बाजार भांडवल 303.68 लाख कोटींवर आले.  मागील व्यवहाराच्या दिनी, ट्रेडिंगच्या दिवशी 11 ऑगस्ट 2023 रोजी बाजार भांडवल 304.68 लाख कोटी रुपये इतके होते. बाजार भांडवलात जवळपास एक लाख कोटींची घट झाली आहे. 

2,172 शेअर्स दरात घसरण

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आज तेजीपेक्षा घसरणीसह  बंद झालेल्या शेअर्सची संख्या जास्त आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,895 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,555 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर, 2172 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 168 शेअर्स दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 208 कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 52 कंपन्यांनी त्यांचा नवीन 52 आठवड्यांच्या नीचांका गाठला. आजच्या व्यवहारात 302 कंपन्यांच्या शेअर दरात अप्पर सर्किट लागले. तर, 297 कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. 


कोणत्या शेअर दरात तेजी-घसरण

आजच्या व्यवहारात, इन्फोसिसच्या शेअर दरात 1.58 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, एचयूएलमध्ये 1.26 टक्के, रिलायन्सच्या शेअर दरात 1.13 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, स्टेट बँकेच्या शेअर दरात 2.37 टक्के, टाटा स्टीलच्या दरात 1.79 टक्के, बजाज फिनसर्वच्या शेअर दरात 1.39 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 0.74 टक्क्यांची घसरण दिसून आली.  

इतर महत्त्वाची बातमी :