शेअर बाजार सुरुवातीलाच गडगडला, निफ्टीमध्येही घट
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 05:59 AM (IST)
मुंबई: अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवल्यानं जगभरातले शेअर बाजार कोसळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजार 423 अंशांनी खाली आला आहे. तर राष्ट्रीय शेअर निर्देशांकातही 134 अंशांची घट झाली आहे. भारतासोबतच चीन, जपानसह संपूर्ण आशियातलेही बाजार गडगडले आहेत. अमेरिकी बाजारातही 3 महिन्यातील सर्वात मोठी घसरगुंडी नोंदवली गेली आहे. डाऊ जोन्स तब्बल 400 अंकानी खाली गेला आहे. भारतातल्या रिझर्व्ह बँकेप्रमाणे अमेरिकेत फेडरल बँक कार्यरत आहे. अमेरिकाच सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्यानं फेडरल बँकेनं केलेली छोटी व्याजदरवाढ जगभरातल्या शेअर बाजारावर मोठी परिणामकारक ठरते.